शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

खराब रस्त्यामुळे आणखी एकाचा बळी

By admin | Updated: September 9, 2016 02:27 IST

खराब प्रतीच्या रस्ते कामाकरिता सुप्रीम इन्फ्र ास्ट्रक्चर या कंपनीविरोधात जिल्ह्याच्या ठिकाणी नुकतेच निलेश सांबरे या सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषण केले.

वाडा : खराब प्रतीच्या रस्ते कामाकरिता सुप्रीम इन्फ्र ास्ट्रक्चर या कंपनीविरोधात जिल्ह्याच्या ठिकाणी नुकतेच निलेश सांबरे या सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषण केले. या धसक्याने कंपनीने रस्त्यांना तात्पुरती डागडुजी करण्याचा देखावाही केला. मात्र, सोमवारी गणपती आगमनाच्याच दिवशी डाकिवली गावातील एका तरूणाचा खराब रस्त्यामुळे बळी गेल्याने ही सर्व मलमपट्टी कुचकामी असल्याचेच सांगून गेली.गणेश रवींद्र बंदरे ( २८) हा डाकिवली येथील तरूण चिखले येथून नातेवाइकांकडील गणपतीचे दर्शन घेऊन परतत असतांना कुडूस येथील पेट्रोलपंपाजवळ खड्ड्यांत मोटारसायकल आदळून समोरून येणाऱ्या टेम्पोला धडक बसून त्याचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी खुपरीनजीक कंचाडफाटा येथे कार व एसटीचा अपघात झाला.रस्ता दुरूस्तीदरम्यान, भरलेल्या खड्ड्यांतील माती व खडी आजूबाजूला पसरल्यामुळेच गणेश यांचा गाडी घसरून मृत्यू झाला. तर कंचाडफाटा येथील अपघात अरूंद रस्त्यामुळे झाला आहे. यामुळे कंपनीविरोधात जनतेत प्रचंड संताप निर्माण झाला आहे. प्रशासनाने सुप्रीम कंपनी व मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व अपघातग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील व नितेश नाईक यांनी दिला आहे. या अपघातामुळे रस्त्याच्या निकृष्टचेचा विषय चर्चेत आला आहे.वसई/पारोळ: तालुक्यातील सोमवारी झालेल्या वेगवेगळ्या रस्ते अपघातांत एक जण ठार तर सात जण जखमी झाले असून जखमींपैकी तिघे गंभीर आहेत. सर्व जखमींना नरेंद्राचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेतून नजीकच्या दवाखान्यात हलवण्यात आले असून उपचार सुरु आहेत. या अपघातांमध्ये मुंबई कर्णावती महामार्गावरील बावखळ वाघोबा मंदिरासमोरील गुजरात वाहिनीवर बाइक ओव्हरटेक करत असताना पुढे चालणाऱ्या दुसऱ्या बाइकला मागून धडकल्याने धडक देणाऱ्या बाइकवर पाठीमागे बसलेला हनुमंत रामू सापळे-३१ सातिवली, वसईफाटा हा ठार झाला असून चालक गणेश दांडेकर ३० हा जबर जखमी झाला आहे. धडक लागलेल्या बाइकचा चालक सत्यवान महादेव भोसले, झेंडा बाजार वसई हा जखमी झाला आहे.