शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

वैतरणा रस्त्यांचे काम सुरु होणार

By admin | Updated: August 11, 2016 03:46 IST

वैतरणा परिसरातील कणेर ते खाडी- कोशिंबे आणि कणेर ते वैतरणा स्टेशन या महापालिका क्षेत्रातील दोन रस्त्यांचे काम ४५ दिवसांत सुरू केले जाणार आहे

वसई / पारोळ : वैतरणा परिसरातील कणेर ते खाडी- कोशिंबे आणि कणेर ते वैतरणा स्टेशन या महापालिका क्षेत्रातील दोन रस्त्यांचे काम ४५ दिवसांत सुरू केले जाणार आहे. २०१४ मध्ये याबाबतचा मंजूर झालेला ठराव अमलामध्ये यावा यासाठी बुधवारी शिवसेना व आगरी सेनेने कणेर फाटा येथे रास्ता रोको केला. त्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून त्याने हे आश्वासन दिले. सकाळी अकराच्या सुमारास कणेर येथे मोठ्या प्रमाणात जमलेल्या शिवसैनिक आणि आगरी सेनेचे कार्यकर्ते यांनी महामार्ग - विरार आणि वैतरणा परिसरात जाणारे दोन्ही रस्ते सुमारे २ तास रोखले. यावेळी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण यांनी वसई- विरार शहर महापालिका भ्रष्ट होत चालली असून, सत्ताधारी बहुजन विकास आघाडी ग्रामीण भागाचा विकास करण्यात असमर्थ ठरली आहे. ३० वर्ष वैतरणा परिसरातील जनतेला विकासापासून वंचित ठेवले आहे. निवडणूक आली की येथील पाणीपुरवठा आणि रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आणायचा आणि नंतर येथे फिरकायचेही नाही असा त्यांचा कारभार सुरु आहे. दोन्ही रस्त्यांचे कॉंक्रीटीकरणाचे काम सुरु झाल्याशिवाय आता शांत बसणार नाही. यावेळी शिवसेना विरार शहरप्रमुख दिलीप पिंपळे यांनी सत्त्ताधारी बविआचा चांगलाच समाचार घेतला नगरसेवक,आमदार आणि आयुक्त यांना येथील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी वेळ नाही, मात्र गावे महापालिकेत पाहिजेत, कशासाठी? असे सांगून रस्त्यांसाठी २५ कोटी ८४ लाख रू मंजूर करण्यात आले. (वार्ताहर)