शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

वसईत मिळते गोवर रुबेला सर्टिफिकेटची झेरॉक्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 23:59 IST

आधीच गोवर -रुबेला लसीकरण मोहिमेबाबत कही गम कही खुशी असे वातावरण असतांना आता या लसीकरण मोहीमे अंतर्गत लाभार्थ्यांना लसीकरणानंतर मूळ सर्टीफिकेट देण्याऐवजी त्याची झेरॉक्स प्रत दिली जात असल्याचे आमची वसई संघटनेचे रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी निदर्शनास आणले आहे.

वसई : आधीच गोवर -रुबेला लसीकरण मोहिमेबाबत कही गम कही खुशी असे वातावरण असतांना आता या लसीकरण मोहीमे अंतर्गत लाभार्थ्यांना लसीकरणानंतर मूळ सर्टीफिकेट देण्याऐवजी त्याची झेरॉक्स प्रत दिली जात असल्याचे आमची वसई संघटनेचे रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी निदर्शनास आणले आहे.त्यांनी ही गंभीर बाब महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या निदर्शनास आणून देखील त्याने त्याची कुठलीही दखल घेतलेली दिसून आली नाही, याउलट समोर मिळालेले उत्तर हे मात्र धक्कादायक असल्याचे हि कळते.ढगे यांच्या माहितीवरून अंगणवाडी क्र .९६ मधे गोवर-रु बेला लसीकरण मोहीमेत मूळ सर्टीफिकेट चा वापर न करता चक्क त्याच्या झेरॉक्स प्रतीचा सर्रास वापर होत असतांना रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी पाहिले, त्यांनी तात्काळ येथील आरोग्य सेविकेला या मूळ सर्टीफिकेटची झेरॉक्स प्रत का वापरण्यात येते. याबाबत विचारले असता आरोग्यसेविकेने गोवर-रुबेला लसीकरण सर्टीफिकेटस संपली असून मागील आठ दिवसांपासून आम्ही आरोग्य विभागाकडे त्याची मागणी करत आहोत, ती मिळत नसल्यानेच आम्ही अशा झेरॉक्स पालकांना देतोय असे धक्कादायक उत्तर मिळाले.दरम्यान याबाबत स्वत: राजेंद्र ढगे यांनी पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सर्टीफिकेट आजच उपलब्ध झाली आहेत, असे उत्तर मिळाले. तर ढगे यांच्या मागणीनुसार मागील काही दिवस ज्या बालकांचे लसीकरण केले आहे त्यांना आपण पुन्हा मूळ सर्टीफिकेट देणार आहेत का? असे विचारले असता त्यांनी काहीच ठोस उत्तर दिले नाही.देशभर सुरु असलेली गोवर-रुबेला लसीकरण मोहीम याआधीच वादात आहे आणि असे असताना देखील सर्टीफिकेटची झेरॉक्स प्रत लाभार्थी पालकांना देणे हे कितपत योग्य आहे याची कुणीच कशी पर्वा करत नाही. आणि त्यात या सर्टीफिकेटची झेरॉक्स महा पालिकेच्या आरोग्य विभागाने साक्षांकित केली नसल्याने त्याची वैधता किती आहे हे मात्र कळण्यास मार्ग नाही.सर्टीफिकेटस नसताना मोहीम राबवणे हे उचित नाही. अशी चर्चा आरोग्य क्षेत्रामध्ये व शिक्षणक्षेत्रामध्ये सुरू आहे. त्याचे कोणते उत्तर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आहे.नवा भ्रष्टाचार उघडकीस येणार?सर्टीफिकेट च्या नावाने नवीन भ्रष्टाचार उघडकीस येईल का असा हि संशय व्यक्त होत आहे. गोवर-रुबेला लसीकरण दर्जा गुणवत्तेबाबत चर्चा सुरू असताना हे झेरॉक्स प्रकरण मोहिमेला ब्रेक लावणार तर नाही ना ? याची आता धास्ती वाटते.पालिकेच्या आरोग्य विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेउन संबधीत पालकांना मूळ सर्टीफिकेट मिळेल व पुन्हा असे दाखले कमी पडणार नाहीत अशी व्यवस्था करावी.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार