शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

वसईत क्लिनअप मार्शल फेल

By admin | Updated: August 11, 2015 23:35 IST

महानगरपालिका हद्दीमध्ये क्लिनअप मार्शल तैनात करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न प्रशासनाच्या अंगलट आला आहे. या माध्यमातून स्वच्छतेबाबत कोणतीही उपाययोजना होत नसल्याचे स्पष्ट

वसई : महानगरपालिका हद्दीमध्ये क्लिनअप मार्शल तैनात करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न प्रशासनाच्या अंगलट आला आहे. या माध्यमातून स्वच्छतेबाबत कोणतीही उपाययोजना होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दंड आकारण्याऐवजी मार्शल स्वत:चे खिसे भरू लागल्याचे प्रथमदर्शनी आढळल्यामुळे ही योजना राबवायची की नाही असा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.वर्षापूर्वी महानगरपालिकेने आपल्या हद्दीत थुंकणाऱ्या नागरीकांना रोखण्यासाठी क्लिनअप मार्शल योजना अंमलात आणली. ही योजना गेले वर्षभर एका ठेकेदाराच्या माध्यमातुन राबवण्यात येत आहे. परंतु त्याचा अपेक्षीत परिणाम न जाणवल्यामुळे ही योजना चालू ठेवायची की नाही अशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या योजनेला अनेक नगरसेवकांचाही विरोध आहे. हे क्लिनअप मार्शल वेळप्रसंगी नागरीकांशी हाणामाऱ्या करतात त्यामुळे या योजनेबाबत नागरीकांमध्ये प्रचंड संताप आहे. दिलेले उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी हे क्लिनअप मार्शल अनेकदा बळाचा वापर करीत असतात. त्यामुळे गेल्या वर्षभरात वाद-विवाद व हाणामाऱ्याच्या अनेक घटना घडल्या. एवढे सारे होऊनही हद्दीतील स्वच्छतेचे तीनतेराच वाजले असल्यामुळे ही योजनाच गुंडाळण्याची तयारी प्रशासनाने चालवली आहे. यापूर्वी अनेक नगरसेवकांनी या योजनेचा विपरीत परिणाम होत असल्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. (प्रतिनिधी)