शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

वसईत जमावाचा पालिका, पोलीस अधिका-यांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 06:47 IST

बेकायदा चाळी तोडण्यासाठी राजीवली येथे गेलेल्या वसई विरार महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकासह पोलिसांवर सुमारे चारशे लोकांच्या जमावाने तुफानी दगडफेक करून हल्ला केला

वसई : बेकायदा चाळी तोडण्यासाठी राजीवली येथे गेलेल्या वसई विरार महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकासह पोलिसांवर सुमारे चारशे लोकांच्या जमावाने तुफानी दगडफेक करून हल्ला केला. त्यांनी महापालिकेचा जेसीबी, कार आणि मोटारसायकली पेटवल्या. यात पालिकेचे काही अधिकारी आणि पोलीस जखमी झाले आहेत. रात्री पोलिसांनी वीस हल्लेखोरांना अटक केली आहे.या परिसरात आदिवासी आणि वनखात्याच्या जागेवर बेकायदा चाळी बांधल्या आहेत. त्या तोडण्यासाठी महापालिकेचे दोन अतिरिक्त आयुक्त, दोन उपायुक्त, सहायक आयुक्त यांच्यासह ५० कर्मचारी गुरुवारी सकाळी गेले होते. सोबत ३५ पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि पालिकेचे २० सुरक्षा रक्षकही होते. एक पोकलेन मशीन, तीन जेसीबींच्या साहाय्याने तीनशे खोल्या पाडण्यात आल्या. यामुळे संध्याकाळी ५नंतर चाळ माफिया व रहिवासी हिंस्त्र झाले. त्यांनी येथे राहणाºया लोकांना चिथवले. त्यामुळे सव्वापाचच्या सुमारास चारशे महिला - पुरुषांच्या जमावाने महापालिकेच्या पथकावर तुफान दगडफेक केली. यामुळे महापालिका अधिकारी-कर्मचारी आणि पोलिसांची पळापळ झाली. जमावाने दगडफेक करीत त्यांचा पाठलाग करून त्यांना कारवाईपासून रोखले. परिस्थिती पाहता जादा पोलीस कुमक मागवण्यात आल्यानंतर पोलिसांनी अश्रुधूर आणि लाठीचार्ज करून हल्लेखोरांना पिटाळून लावले. रात्री उशिरापर्यंत वीस हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू केली होती. उद्यापासून पुन्हा कारवाई सुरू ठेवण्यात येणार असून हल्लेखोरांना अटक करण्याचे सत्र पोलीस सुरू ठेवणार आहेत.जमावाने महापालिकेच्या जेसीबीसह एक कार आणि काही मोटारसायकलीं पेटवून दिल्या. पोलिसांच्या गाड्यांचीही नासधूस केली. या हल्ल्यात महापालिका अधिकारी कर्मचाºयांसह काही पोलीसही किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी २० हल्लेखोरांना अटक केली आहे.