शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

येत्या डिसेंबरमध्ये वसईत क्रीडा स्पर्धा

By admin | Updated: August 26, 2015 23:47 IST

वसईत जिल्हास्तरीय शालेय क्रीडास्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय मनपाच्या नुकत्याच झालेल्या महासभेत घेण्यात आला. या स्पर्धा येत्या डिसेंबर महिन्यात घेण्यात येतील असा

वसई : वसईत जिल्हास्तरीय शालेय क्रीडास्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय मनपाच्या नुकत्याच झालेल्या महासभेत घेण्यात आला. या स्पर्धा येत्या डिसेंबर महिन्यात घेण्यात येतील असा अंदाज आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी चालू वित्तीय वर्षात २ कोटी १२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.वसई विरार शहर महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर गेल्या ६ वर्षात महानगरपालिकेने उपप्रदेशातील क्रीडापटूना प्रोत्साहन देण्याकरीता विविध योजना व स्पर्धांचे आयोजन केले. त्यामध्ये विभागवार कलाक्रीडा स्पर्धा, मॅरेथॉन अशा स्पर्धांचा समावेश आहे. यासर्व स्पर्धांच्या यशस्वी आयोजनानंतर आता महानगरपालिकेने जिल्हास्तरीय शालेय क्रीडास्पर्धेच्या आयोजनाचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या महासभेत मांडला होता. त्यास सर्वानुमते मंजुरी मिळाली.या स्पर्धेमध्ये फुटबॉल, बुद्धीबळ, हँडबॉल, बॉक्सींग, मल्लखांब, कॅरम, कराटे, बॅडमिंटन, अ‍ॅथलेटीक्स, व्हॉलीबॉल, टेबलटेनीस, कबड्डी, जलतरण, स्केटींग व बास्केटबॉल स्पर्धांचा समावेश आहे. या स्पर्धांच्या आयोजनासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मंजुरी देण्यात आली. सन २०१५-१६ च्या आर्थिक वर्षात क्रीडाविषयक राखीव निधीतून या स्पर्धांसाठी तरतूद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)