शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वसईत तीन हजार किलो दूषित बर्फ नष्ट

By admin | Updated: May 29, 2017 05:44 IST

ऐन उन्हाळ््यात वसईत सुमारे तीन हजार किलो दूषित बर्फ जप्त करून नष्ट करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क वसई : ऐन उन्हाळ््यात वसईत सुमारे तीन हजार किलो दूषित बर्फ जप्त करून नष्ट करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली. त्यामुळे वसई विरार परिसरात आरोग्याला हानीकारक असलेल्या दूषित बर्फाची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याची बाबही उजेडात आली आहे. वसई विरार परिसरात बर्फाचे कारखाने नाहीत. मात्र, सध्या उन्हाने लोकांना भंडावून सोडले आहे. त्यामुळे शहरात लिंबू सरबत, उसाचा रस, सरबते, आईस्क्रीम, बर्फाचे गोळे, शितपेये विक्री करणाऱ्यांचा धंदा तेजीत आला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर बर्फाचा वापर केला जात आहे. मात्र, हा बर्फ दूषित असून आरोग्याला घातक असल्याचे अन्न व प्रशासनाच्या कारवाईनंतर उजेडात आले आहे. प्रशासनाने विविध ठिकाणी धाडी टाकून तब्बल तीन हजारो किलो बर्फ जप्त करून तो नष्ट केला. वसई विरार परिसरात ठाणे, कल्याण आणि कोपर खैरणे येथून बर्फ आणला जातो. हा बर्फ गोदामात साठवून ठेवला जातो. त्यानंतर मागणीनुसार त्याचा विक्रेत्यांकडे पुरवठा केला जातो. बर्फाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या दूपित पाण्याचा वापर करून बर्फ बनवत असतात. या बर्फात असलेले ई कोलाय आरोग्यास घातक जीवाणू आढळून आले आहेत. या यामुळे अतिसार, जुलाब, कॉलरा, विषमज्वर, कावीळ आणि साथीच्या रोगांची लागण होत असल्याचेही निष्पन्न झाले आहे. दरम्यान, अन्न व प्रशासन विभागाने छापे मारून जप्त केलेला बर्फ नष्ट करून टाकला आहे. तसेच याचे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविले आहेत. संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रमुख शंकर बने यांनी केली आहे.