शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

वसईत चेनचोरांचा सर्वत्र झाला सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 23:22 IST

पोलीस ढिम्म : सीसीटीव्हीचा दरारा नाहीच

नालासोपारा : वसई तालुक्यात गेल्या काही दिवसापासून चेन चोरांचा सुळसुळाट झाला असून मोटार सायकलवर आलेले चोरटे लाखों रु पये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने खेचून पळून जात आहे. या चेन चोरांवर अंकुश लावण्यात पालघर पोलीस अपयशी ठरले असून या गुन्ह्यांची उकल करून आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. चेन चोरांच्या दहशतीमुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. विरार, नालासोपारा आणि तुळींज या तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोन्याचे गळ्यातील दागिने खेचून नेल्याचे गुन्हे दाखल केले असून तपास करत आहे.

नालासोपारा पश्चिमेकडील सेंट फ्रान्सिस शाळेसमोरील गोपाल कृष्ण कुंज इमारतीमध्ये रूम नंबर २०४ मध्ये राहणाऱ्या सुलोचना सदानंद गादीकर (६४) ह्या शनिवारी संध्याकाळी पूर्वेकडील तुळींज रोडच्या साईदत्त मंदिरात संत्संगाला गेल्या होत्या त्या रात्री पावणे दहाच्या सुमारास पाटणकर पार्क रोडवरून पायी घरी जात असतांना सेंट फ्रान्सिस शाळेच्याजवळ आल्यावर समोरून वेगाने मोटार सायकलवरून आलेल्या दोघांपैकी एकाने गादीकर यांच्या गळ्यातील १ लाख ८० हजार रु पये किंमतीचे सहा तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, ३५ हजार रुपयांची १२ ग्रॅम सोन्याची चेन आणि ७५ हजार रुपयांचे पंचवीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे छोटे मंगळसूत्र असा एकूण २ लाख ९० हजार रु पयांचे दागिने खेचून पळून गेले.

मंगळसूत्र पळविलेविरार पूर्वेकडील फुलपाडा येथील विकास नगरी -२ मधील श्री मंगलम अपार्टमेंटमध्ये रूम नंबर २०६ मध्ये राहणाºया तनुजा राजेंद्र ताकटे (३५) ह्या शनिवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास कामावर जाण्यासाठी घराबाहेर निघाल्या. फुलपाडा रोडवर पायी चालत असताना पाठीमागून मोटार सायकलवरून आलेल्या एका चोरट्याने तनुजा यांच्या गळ्यातील ४५ हजार रु पये किंमतीचे १५ ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेले आहे.

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरारtheftचोरी