शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार पालिकेचा कोट्यवधींचा कर थकला; महापालिकेचे ३०० कोटींचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 00:49 IST

केवळ १६९ कोटीच वसूल

- आशीष राणे वसई : दरवर्षी ३०० कोटी किंवा त्यापेक्षा अधिक करवसुलीचे उद्दिष्ट ठेवून कार्य करणारी महापालिका आणि तिचा करसंकलन विभाग यंदा करवसुलीत मागे पडताना दिसत आहे. किंबहुना पालिकेला आयुक्त व उपायुक्त नसल्याचा हा परिणाम तर नाही ना, अशीही चर्चा पालिका वर्तुळात दबक्या आवाजात ऐकू येत आहे.

आजवर केवळ रु. १६९ कोटीचाच मालमत्ता कर वसुली करण्यात आला असल्याची आकडेवारी महापालिका प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे. उर्वरित रु. १३१ कोटींच्या मालमत्ता करवसुलीसाठी पालिकेकडे चालू आर्थिक वर्षातील केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला असल्याने मालमत्ता करवसुलीचे काम युद्धपातळीवर अधिक जोमाने करावे लागणार आहे.

पालिकेने यंदाच्या वर्षीही ३०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले असले तरी त्यापैकी केवळ १६९ कोटींची करवसुली करण्यात आली आहे. उर्वरित मालमत्ता करवसुली करण्यासाठी पालिका विविध प्रकारच्या उपाययोजनांचा अवलंब करून पुढील मालमत्ता कराची वसुली केली जाणार असल्याचे या वेळी पालिकेने स्पष्ट केले आहे.

वसई-विरार भागात छोट्या-मोठ्या औद्योगिक वसाहती, उपाहारगृहे, इमारती, सदनिका, मॉल, शॉपिंग सेंटर्स आदी अशा विविध प्रकारच्या साडेसात लाखांहून अधिक मालमत्ता आहेत. यामधील काही मालमत्ताधारकांनी व प्रसिद्ध विकासकांनीही पालिकेचा मालमत्ता कर थकविला आहे. त्यांना रीतसर देयके व नोटिसा काढून मालमत्ता कर वसूल केला जातो.

मात्र तरीही काही मालमत्ताधारक अद्यापही कर भरण्यासाठी पुढे येत नसल्याने त्याचा मोठा परिणाम महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर होतो आहे. यासाठी पालिकेच्या कर संकलन विभागाने आता कंबर कसली आहे. पालिकेने मालमत्ता कर थकविणाऱ्या मालमत्ताधारकांना मालमत्ता जप्तीच्या नोटिसा, चौकात करथकबाकीदारांचे नामफलक, नळजोडण्या खंडित करणे आदी उपाय योजले जात आहेत.

करवसुलीसाठी जनजागृती रॅली, चौक सभा!

महापालिकेला मालमत्ता कर भरण्याची ३१ डिसेंबरची मुदत उलटूनही थकबाकीदार कर भरण्यासाठी पुढे येत नसल्याने मालमत्ता करवसुलीसाठी पालिका अधिकारी, कर्मचारी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक यांच्यातर्फे विविध प्रकारे प्रयत्न केले जात आहेत.च्पालिकेच्या सर्वच नऊ प्रभाग समितीअंतर्गत विभागवार दुचाकीवरून रॅली काढण्यात येत आहे. यात ज्या मालमत्ताधारकांची कराची रक्कम थकीत आहे, त्यांनी लवकरात लवकर मालमत्ता कर व पाणीपट्टीकराचा भरणा करावा, असे आवाहन या रॅलीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.दवंडी पिटून आवाहन : मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी नऊ प्रभागांत पथके नेमण्यात आली असून या पथकांमार्फत कर थकविणाºया मालमत्ताधारकाच्या घरी जाऊन आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी मालमत्ताधारक राहात असलेल्या ठिकाणी दवंडीही पिटवण्यात येत आहे. तर काही ठिकाणी पाणीपुरवठा खंडित करणे, मालमत्ता जप्ती, मोठी रक्कम थकीत असलेल्या नागरिकांचे चौकात नामफलक अशा उपाययोजना केल्या जात आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र