शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार महापालिका डेंग्यू, हिवतापाने जेरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 06:11 IST

यंत्रणा ठरल्या कुचकामी : आजार वाढत असताना प्रशासन म्हणते २१ रुग्ण

नालासोपारा : सप्टेंबर संपून आॅक्टोबर सुरू होताच वसई विरारमध्ये साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. जुलै महिन्यातील वसईतील पुरानंतर शहराची आरोग्य व्यवस्था बिघडली असून डेंग्यूची साथ असताना आता त्याता हिवतापाची भर पडली आहे. शहरातील अनेक खाजगी रु ग्णालयात डेंग्यू आणि हिवतापाचे रु ग्ण उपचार घेत आहे. यामुळे नागरिक त्रस्त असून पालिकेची यंत्रणा साथीचे आजार रोखण्यास अपयशी ठरली आहे.

शहरातील अनेक नागरिकांना डेंग्यू व मलेरियाची लागण झाल्याचे चित्र आहे. मात्र यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाला अपयश आले आहे. डेंग्यू व मलेरिया यासारखे आजार होऊ नये यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छता, जनजागृती, औषध फवारणी केले जात असल्याचा दावा केला जात आहे. परंतु या साथीच्या आजाराच्या वाढत्या प्रमाणामुळे आरोग्य विभागाचा नाकर्तेपणा पुन्हा एकदा जनतेसमोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून वसईने डेंग्यू रोगाने धुमाकूळ घातला होता. पालिकेने मात्र डेंग्यूची संख्या कमी असल्याचा दावा करत डेंग्यूचे प्रमाण कमी झाल्याचे सांगितले होते. मात्र आता डेंग्यू पुन्हा शहरात दाखल झाला आहे. एव्हरशाईन परिसरात पुन्हा डेंग्यूचे रु ग्ण आढळले आहेत.याआधी विरार मधील एम जी एम नगर येथे खोदण्यात आलेल्या जलवाहिनीच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्यात डेंग्यूचे मच्छर आढळले होते. मात्र यावर पालिकेने उपाययोजना न केल्याने आता या रोगांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. अनेक रु ग्णालयात डेंग्यूचे रु ग्ण असताना पालिकेने केवळ डेंग्यूचे २१ रु ग्ण असल्याचा दावा केला होता. एव्हरशाईन येथील सामाजिक कार्यकर्ते मेलविन सिक्वेरा यांनी सांगितले की, माङया मुलाला देखील डेंग्यूची लागण झाली असून शहरातील अनेक ठिकाणी डेंग्यूचे रु ग्ण मोठ्या संख्येने आहेत. परंतु याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.साथीच्या आजारांवर आम्ही लक्ष ठेवूनमहापालिकेच्या साथ रोग विभागाच्या अधिकारी डॉ. स्मिता वाघमारे यांनी सांगितले की, जानेवारी ते सप्टेंबर २०१८ पर्यंत २१ डेंग्यू चे रु ग्ण व ३५ ते ४० हिवतापाचे रु ग्ण आढळले आहेत. तसेच शहरात होणाऱ्या डेंग्यू रु ग्णांची यादी इतर रु ग्णालयातून मागवून त्यांची पुन्हा तपासणी करून उपचार केले जातात. व साथीच्या होणाºया आजारांवर आरोग्य विभागामार्फत पूर्ण पणे लक्ष दिले जात असते व वेळो वेळी याची जनजागृती करून अनेक ठिकाणी असे साथीचे आजार होऊ नये यासाठी आरोग्य शिबिराचे देखील आयोजन केले जाते असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :dengueडेंग्यूVasai Virarवसई विरार