शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वसई विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांची अखेर बदली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 18:23 IST

रमेश मनाळे यांच्या बदलीचा परिणाम थेट आरोग्य यंत्रणेवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

ठळक मुद्देमहापालिका प्रशासनात मार्च मध्ये रुजू झालेले गंगाधरन डी. यांनी आयुक्तपदाचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी अनेक निर्णय घेतले होते. त्यातील काही निर्णय अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांना पटले नव्हते.

- आशिष राणे

वसई : वसई-विरार शहर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांचा प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने अखेर त्यांची गुरुवारी बदली झाली आहे. राज्य सरकारने 2018 मध्ये रमेश मनाळे यांची वसई-विरार शहर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती केली होती. रमेश मनाळे यांच्या बदलीचा परिणाम थेट आरोग्य यंत्रणेवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

रमेश मनाळे यांचा तीन वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांची प्रतिनियुक्ती संपुष्ठात आणावी, अशी विनंती सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय यांना केली होती. त्यानुसार रमेश मनाळे यांची प्रतिनियुक्त संपुष्ठात आणून त्यांच्या सेवा सनियंत्रित विभाग, सामान्य प्रशासन विभाग-मंत्रालय यांच्याकड़े प्रत्यावर्तित करण्यात आल्याचे आदेश दि.24 जून रोजी राज्य शासनाचे उप सचिव कैलास बधान यांनी काढून ते पालिकेला बजावले असल्याची माहिती पालिका जनसंपर्क अधिकाऱ्यांनी गुरुवारी 'लोकमत'ला दिली.

रमेश मनाळे यांच्याकडे महापालिकेतील अनेक महत्वाची अशी विविध खाती सुरुवातीपासूनच होती त्यात पालिकेच्या पूर्वेमधील सर्व प्रभाग समित्या,कोरोनाच्या संदर्भातील आरोग्य यंत्रणा, उद्यान विभाग, वृक्ष प्राधिकरण, महिला बाल कल्याण, जाहिरात याशिवाय मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्त म्हणून जबाबदारी देखील त्यांच्याकडे होती. 

दरम्यान, महापालिका प्रशासनात मार्च मध्ये रुजू झालेले गंगाधरन डी. यांनी आयुक्तपदाचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी अनेक निर्णय घेतले होते. त्यातील काही निर्णय अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांना पटले नव्हते. त्यांनी आयुक्तांना हे निर्णय मागे घेण्याची विनंती सुद्धा केली होती. यामध्ये सर्वात महत्वाचा निर्णय होता, तो म्हणजे महिला बाल कल्याण विभागातील कर्मचारी कमी करण्याचा होता. हे कर्मचारी कमी केल्याने त्याचा परिणाम योजनांवर झाला होता. परंतु आयुक्तांनी रमेश मनाळे यांचे काहीच न ऐकता अशा निर्णयाला केराची  टोपली दाखविल्याने  दिवसेंदिवस पालिकेत त्यांना काम करणे अवघड जात होते. त्यामुळेच की काय त्यांनी आपली बदली स्वतः हून करून घेतल्याची जोरदार चर्चा सध्या पालिका वर्तुळात सुरू आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार