शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वसई विरार मनपा आता मोबाईलवर

By admin | Updated: August 19, 2016 02:01 IST

वसई विरारच्या नागरिकांना आता पालिकेसंदर्भातील कुठलीही माहिती हवी असेल किंवा कुठलीही तक्रार करायची असेल तर ती एका क्लिकवर करता येणार आहे. त्यासाठी पालिकने

वसई : वसई विरारच्या नागरिकांना आता पालिकेसंदर्भातील कुठलीही माहिती हवी असेल किंवा कुठलीही तक्रार करायची असेल तर ती एका क्लिकवर करता येणार आहे. त्यासाठी पालिकने ‘व्ही अ‍ॅप’ हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन सुरू केले असून स्वातंत्र्यदिनी त्याचा शुभारंभ झाला आहे.महापालिकने संकेतस्थळ सुरू केलेले होते. परंतु नागरिकांच्या अधिक जवळ जाण्यासाठी आणि त्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी पालिकेने आता मोबाईल अ‍ॅप सुरू केले आहे. हे अ‍ॅप्लिकेशन पालिकेचे स्वतंत्र अ‍ॅप्लिकेशन असून सोमवारी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून त्याचा शुभारंभ करण्यात आला. मोबाईल प्ले स्टोर मधून कुठल्याही अ‍ॅण्ड्रॉईड फोनध्ये ते विनमूल्य डाऊनलोड करता येणार आहे. हे अ‍ॅप नागरिकांना अनेक प्रकारे उपयोगी पडणार आहे. पालिकेच्या प्रत्येक विभागाची माहिती या अ‍ॅपवर आहे. पालिकेचे विविध विभाग, विविध योजना, अधिकारी नगरसेवकांचे क्रमांक, आपतकालीन यंत्रणेचे क्रमांक, शहराची माहिती त्यात आहे. नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या सुचना आणि तक्रारीही या अ‍ॅपद्वारे करता येणे शक्य होणार आहे. याशिवाय मालमत्ता कर आणि पाणीपट्टीही नागरिकांना या अ‍ॅपद्वारे भरता येणार आहे. यमुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे तसेच त्यांना पालिकेबरोबर व्यवहार करणे अत्यंत सोपे आणि सोयीचे होणार आहे.पालिका विविध सूचना आणि आवाहन करत असते. पालिकेने सुचना किंवा माहिती दिली तर अ‍ॅपवर नोटिफिकेशन येईल आणि नागरिकांना त्याची माहिती होणार आहे. गुगल प्ले मधून हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर आपली प्राथमिक माहिती भरून नोंदणी करावी लागणार आहे.