शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार अपात्रांच्या हाती

By admin | Updated: February 16, 2016 01:47 IST

आकृतीबंधानुसार पदांवर शैक्षणिक पात्रता असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नेमणुका न झाल्याने तीन हजार कोटींचा टप्पा पार पडलेल्या वसई विरार

शशी करपे,  वसईआकृतीबंधानुसार पदांवर शैक्षणिक पात्रता असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नेमणुका न झाल्याने तीन हजार कोटींचा टप्पा पार पडलेल्या वसई विरार पालिकेचा कारभार सध्या शैक्षणिक पात्रता नसलेल्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या हातात असून प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारीही वारंवार मुदतवाढ घेऊन पालिकेत ठाण मांडून बसले आहेत.पालिकेत आकृतीबंधानुसार अधिक कर्मचारी असल्याने आयुक्त सतीश लोखंडे यांनी १ फेब्रुवारीपासून २ हजार ८४४ कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमची रजा दिली. सध्या २ हजार ८५७ कर्मचारी आहेत. यातील बाराशे कर्मचारी कायमस्वरुपी असून उर्वरित कर्मचारी ठेका पद्धतीवर आहे. विशेष म्हणजे बाराशे मधील सुमारे साडेचारशे सफाई कर्मचारी आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात साडेसातशे अधिकारी-कर्मचारी तीन हजार कोटींचे बजेट असलेल्या पालिकेचे कारभारी आहेत. सध्या पालिकेत अनेक पदे रिक्त आहेत. पहिल्यांदाच सतीश लोखंडे यांच्या रुपाने आयएएस आयुक्त मिळाला. मात्र, नोव्हेंबरपासून अतिरिक्त आयुक्ताचे पद रिक्त आहे. उपायुक्तांची १५ पदे मंजूर असून प्रत्यक्षात दोन उपायुक्त आहेत. सहाय्यक आयुक्तांची ३० पदे मंजूर आहेत, प्रत्यक्षात ९ प्रभाग समित्यां असताना आठ सहाय्यक आयुक्त आहेत. हे आठही पालिकेतील लिपीक असून त्यांना तात्पुरती पदोन्नती देऊन पदावर बसवण्यात आले आहे. याआधी सहाय्यक आयुक्तपदावर नेमलेल्या दोघांना अनधिकृत बांधकामप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. तर दोन महिला सहाय्यक आयुक्तांवर गुन्हे दाखल आहेत.