शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वसई विरारमध्ये रस्त्यावर फिरतात ४५ हजार भटकी कुत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 01:05 IST

वसई विरार शहर महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून नवनवीन घोटाळे उघड झाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. रस्त्यावर फिरणारे भटकी कुत्र्यांच्या नसबंदीचा नवीन घोटाळा झाला असल्याचे व नसबंदी कागदावर दाखवून दीड करोड रु पये मनपा अधिकार्यांनी लाटल्याचा आरोप केला जात आहे.

नालासोपारा : वसई विरार शहर महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून नवनवीन घोटाळे उघड झाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. रस्त्यावर फिरणारे भटकी कुत्र्यांच्या नसबंदीचा नवीन घोटाळा झाला असल्याचे व नसबंदी कागदावर दाखवून दीड करोड रु पये मनपा अधिकार्यांनी लाटल्याचा आरोप केला जात आहे. तर दुसरीकडे रस्त्यावर फिरणारे 45 हजार भटकी कुत्रे मनपाच्या नसबंदी अभियानाची पोलखोल करत असून दररोज वाढणारी भटक्या कुत्र्यांची संख्या चिंतेचा विषय बनला आहे. काही दिवसांपूर्वी विरारच्या लगतच वैतरणा येथे भटक्या कुत्र्यांनी लहान लहान सात मुलांवर हल्ला करून जखमी केले होते. याआधीही असे अनेक हल्ले भटक्या कुत्र्यांनी वसई विरार शहरामध्ये केल्याच्या घटना घडल्या आहे.भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी बाबत वसई विरार शहर महानगरपालिका बजेटमध्ये लाखो रु पये खर्च केल्याचा उल्लेख दरवर्षी केला जातो. भटक्या कुत्र्यांच्या देखरेख आण िनसबंदीसाठी वसई विरार शहर महानगरपालिकेने 2015-2016 साली 13 लाख 78 हजार रु पये खर्च, 2016-2017 मध्ये 33 लाख 43 हजार रु पये खर्च, 2017-2018 या सालामध्ये 56 लाख 25 हजार रु पये खर्च तर 2018-2019 साली 60 लाख रु पये खर्च असा एकूण मागील 4 वर्षांमध्ये 1 करोड 63 लाख 46 हजार रु पये खर्च केला आहे.इतक्या मोठ्या खर्चावर स्थानिक रहिवाश्यांनी सांगितले की, जर मनपा खरोखरच भटक्या कुत्र्यांवर खर्च करण्याचा दावा करत असेल तर विविध परिसरात भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यामुळे सामान्य नागरिकपरेशान आहे. भटक्या कुत्र्यांचीसंख्या दिवसेंदिवस वाढतआहे.वसई विरार मनपाच्या प्रत्येक विभागात भ्रष्टाचार होत असून घोटाळे उघड होत आहे. भटक्या कुत्र्यांची नसबंदी कागदावरच असून त्यासाठी आलेला खर्च अधिकार्यांनी फक्त कागदापुरताच मर्यादित ठेवला आहे. याची चौकशी होणे गरजेचे आहे.- राजकुमार चोरघे (आरोपकर्ते)याबाबत कोणतीही तक्र ार मी पाहिलेली नसून माङयापर्यंत आलेली पण नाही. जर तक्र ार आली तर मी नक्कीच बघेन.- बळीराम पवार (आयुक्त, वसई विरार महानगरपालिका)

टॅग्स :dogकुत्राVasai Virarवसई विरार