शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वसई तालुका गुजरातमध्ये, गुज्जू व्यावसायिकांचा प्रताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 03:23 IST

महाराष्ट्रातून हद्दपार करून त्याचा गुजरात राज्यात समावेश करण्याचा प्रताप काही व्यावसायिकांनी केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

वसई : या तालुक्याला महाराष्ट्रातून हद्दपार करून त्याचा गुजरात राज्यात समावेश करण्याचा प्रताप काही व्यावसायिकांनी केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.मुंबई-अहमदाबाद हायवेवरील घोडबंदर ते तलासरी दरम्यानच्या बहुतांश धाबे, दुकाने, हॉटेलांवर आता गुजराती पाट्या झळकू लागल्या आहेत. या पाट्यांवरून मराठीला तडीपार केल्याचे दिसत असतांना आता वसई तालुक्यातही गुजराती फलक झळकू लागले आहेत. इतकेच नाही तर वसई तालुका महाराष्ट्रात नव्हे तर गुजरातमध्ये असल्याचे उघडपणे लिहिण्याचे धाडस गुजराती समाजाकडून केले जात आहे.तालुक्यातील गुजराती व्यावसायिक आणि उद्योजकांनी आपल्या वसईतील पत्त्यातील राज्याच्या रकान्यात महाराष्ट्रा ऐवजी गुजरात राज्य असा उल्लेख करून वसई गुजरात राज्यात असल्याचे उघडपणे लिहीण्यास सुरुवात केली आहे. वसई पूर्वेकडील औद्योगिक वसाहतीमधील एका उद्योजकाने राजप्रभा इंडस्ट्रीयल इस्टेट, शॉप क्रमांक ४, बिल्डींग क्रमांक १ असा पत्ता लिहीताना त्यात राज्य महाराष्ट्र लिहीण्याऐवजी गुजरात राज्य असा उल्लेख करून गुजरात राज्यातील हा ३८४३४० पिनकोडही टाकला आहे.वसईसह पालघर जिल्हयाचा गुजरातमध्ये समावेश करण्याचा कट शिजला जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. याप्रकरणी खळळ खट्याक करण्यास आम्ही तयार आहोत, असा इशारा तिने दिला आहे.>नालासोपाराही गुजरातमध्येनालासोपाºयात एका व्यावसायिकाने नालासोपारा ईस्ट, वसई, गुजरात असा स्पष्ट उल्लेख असलेला फलक लावला आहे. मराठीला तडीपार करतांना महाराष्ट्राऐवजी चक्क गुजरात राज्य लिहून व्यावसायिकांनी गुजरातला महत्व दिल्याने मनसेचे कार्यकर्ते संतापले आहेत.