शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

वसई :२९ गावांचा न्यायनिवाडा नाहीच; अंतिम सुनावणीसाठी पुन्हा वाट पाहावी लागणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 20:37 IST

गेल्या अनेक वर्षांपासून निर्णय प्रलंबित. शुक्रवारीही सुनावणी न झाल्याची माहिती.

ठळक मुद्देगेल्या अनेक वर्षांपासून निर्णय प्रलंबित. शुक्रवारीही सुनावणी न झाल्याची माहिती.

आशिष राणे वसई : 29 गावांचा समावेश महापालिकेतच राहणार की त्या वगळलेल्या 29 गावांची स्वतंत्र नगरपंचायत निर्माण होणार याबाबतीत 11 जून 2021 रोजी मुंबईउच्च न्यायालयात मागील दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सदरच्या याचिकेवर निर्णय येणार होता. मात्र शुक्रवारी ही सुनावणी झालीच नसल्याची माहिती गाव बचाव आंदोलनचे मिलिंद खानोलकर यांनी लोकमतला दिली.या गावांच्या अंतिम सुनावणीच्या बाबतीत बोलताना कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईउच्च न्यायालयातील कामकाज केवळ ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. तर आता दि 15 जून नंतर पुन्हा एकदा उच्च न्यायालयास विनंती करून या 29 गावांच्या सुनावणी बाबतीत पुन्हा तारीख घेतली जाईल, असे मिलिंद खानोलकर यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.दरम्यान, मागील 10 वर्षांपासून वसई विरार महापालिकेतून 29 गावे वगळण्याचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. किंबहुना दोन महिन्यांपूर्वी दि 9 एप्रिल 2021 रोजी मुंबई उच्च न्यायालयात अंतिम निर्णय टप्प्यावर असताना सुनावणी संपन्न झाली. मात्र सरकारी पक्षाचे ज्येष्ठ वकील तांत्रिक कारणांमुळे गैरहजर राहिल्याने तो निर्णय झाला नाही.याउलट त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला 29 गावे वगळण्याच्या संदर्भातील सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलून  राज्य सरकार सोबत सल्लामसलत करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी दिला होता आणि तोच अवधी शुक्रवार दि 11 जून रोजी संपुष्टात येऊन मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवार दि.11 जून 2021 रोजी 29 गावा संदर्भात अंतिम निर्णय येण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र शुक्रवारी गावं वगळण्याच्या याचिकेबाबत काहीही निर्णय आला नाही. त्यासाठी आता पुन्हा काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.  

टॅग्स :Vasai Virarवसई विरारHigh Courtउच्च न्यायालयMumbaiमुंबईGovernmentसरकार