शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

वसई, नालासोपारा, विरार पहिल्याच पावसात जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 00:27 IST

वसईत शुक्र वारी पहाटेपासून पावसाने जोरदार सुरुवात केल्यावर वसई-विरार आणि नालासोपारात सखल भागात पाणी भरले असून पुन्हा एकदा वसई पाण्याखाली जाण्याची भीती आता नागरिकांना वाटते आहे.

- आशिष राणेवसई - वसईत शुक्र वारी पहाटेपासून पावसाने जोरदार सुरुवात केल्यावर वसई-विरार आणि नालासोपारात सखल भागात पाणी भरले असून पुन्हा एकदा वसई पाण्याखाली जाण्याची भीती आता नागरिकांना वाटते आहे.दरम्यान शुक्र वार रात्रीपासून पडणाऱ्या पावसाने धुवाँधार वेग घेत संपूर्ण वसई विरार व नालासोपारात पालिकेसहीत नागरिकांची दैना उडवून दिली.यामध्ये नालासोपारा पूर्वेकडील सेंट्रल पार्क, विजय नगर, आचोळे, अग्रवाल नगर, तुळींज रोड, संतोष भवन, तर पूर्वेतील धानीव बाग, सातिवली व पश्चिममेकडील निलेगाव, पाटणकर पार्क आदी परिसरात पाणी साठले आहे.तसेच विरारमधील फुलपाडा रोड, चंदनसार आदी भागात आणि वसईतील सनसिटी, एव्हरशाईन भागात पाणी साचले आहे. एकूणच पावसाचा जोर असाच राहिला तर आणखी काही वेळेनंतर वसईत पुन्हा गतवर्षीची पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही तशी परिस्थिती निर्माण झाल्यास महापालिका प्रशासन सज्ज असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.पहिल्याच पावसात दैना; पालिकेचे आढावा सभेतील दावे फोल ठरले आहेत. वसई-विरारमध्ये शुक्र वारी रात्रीपासून कोसळणाºया धुवाँधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले असून पहिल्याच पावसाने पालिका प्रशासन व वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्या असून, सखल भागात राहणाºया नागरिकांच्या घरात गतवर्षी सारखेच पाणी शिरले आहे. त्यामुळे महापालिकेचे दावे फोल ठरले आहेत.महापालिका घेणार का धडा?गतवर्षी वसई-विरार परिसरात पडलेल्या पावसाने जवळ-जवळ आठवडाभर जनजीवन विस्कळीत केले होते. यापासून धडा घेऊन यंदाच्या वर्षी पूर परिस्थिती निर्माण होणार नाही. याची काळजी घेतल्याचा केलेला दावा व्यर्थ ठरला. महापालिकेने कोट्यवधी खर्चून निरी आणि आयआयटीचा अहवालही अनुसरला होता.‘वसई विरार महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज असून ज्या परिसरात पाणी भरले आहे. ते काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. याउलट ज्या-ज्या परिसरात पाणी साचून आहे, तेथील नागरिकांनी महापालिकेशी संपर्क साधावा. त्या परिसरात तातडीने आपत्कालीन यंत्रणा पुरविण्यात येईल.’ जनतेने घाबरून जाऊ नये.- बी. जी. पवार,आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका (मुख्यालय)

टॅग्स :RainपाऊसVasai Virarवसई विरार