शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

वसई किल्ल्यातील हनुमान मंदिर @ २७८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:13 IST

वसई किल्ल्याच्या दर्या दरवाजाजवळच असलेल्या हनुमान मंदिराला २७ जुलैला २७८ वर्षे पूर्ण झाली. स्वत: नरवीर चिमाजी अप्पांनी या मंदिरात कोरीव मिशा

वसई : वसई किल्ल्याच्या दर्या दरवाजाजवळच असलेल्या हनुमान मंदिराला २७ जुलैला २७८ वर्षे पूर्ण झाली. स्वत: नरवीर चिमाजी अप्पांनी या मंदिरात कोरीव मिशा, डोक्यावर सैनिकी मुकुट, कमरेला खंजीर, पायाखाली राक्षस, शेपटीला पिळ असलेली मानवी चेहरा असलेली हनुमानाची मुर्ती बसवली होती. वसई किल्ल्याच्या दर्या दरवाजाजवळच कौलारु छपरांचे अत्यंत साधे व आटोपशीर आकाराचे श्री हनुमान मंदिर आहे. या मंदिराच्या आतील भागात घुमटीयुक्त देवडीत हनुमानाची मुर्ती आहे. १६ मे १७३९ रोजी मराठ्यांनी वसई काबिज केल्यावर २७ जुलै १७३९ रोजी किल्ल्यातील दर्या दरवाजा व भुईदरवाजा याठिकाणी प्रत्येकी एक हनुमान मुर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. नरवीर चिमाजी अप्पांनी २० जुलै १७३९ रोजी माणकोजी पाथरवटाकडून हनुमानाची मूर्ती तयार करून तिची विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठापना केली होती.वसई किल्ल्यातील नागेश्वर मंदिर व वज्रेश्वरी मंदिर बांधकामाचा पायादेखिल पहिले पेशवे बाजीराव व चिमाजी अप्पा जिवंत असताना घालण्यात आला होता. इ.स. १७३९ ते १८१८ कालखंडाचा मराठेशाहीचा इतिहास जपणारी व पाहणारी ही गौरवमुर्ती म्हणून ओळखली जाते. किल्ल्याच्या दर्या दरवाजाचे संरक्षण करणारी हनुमानाची मुर्ती पेशवेकालीन आरमारी संघर्ष, सामर्थ्य आदी घटनांचा मूक इतिहास जपणारी आहे. किल्याच्या इतिहासाच्या साधनांमध्ये या हनुमान मुर्तीचा समावेश होतो.