शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वसईमध्ये २ हजार २४५ गौराईंचे आगमन : माहेरवाशिणीला मटण आणि चिंबोरीचा नैवेद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:12 IST

वसई तालुक्यात गौराईचे मंगळवार दुपारपासूनच पावसाच्या हजेरीत उत्साहाने स्वागत झाले. वसईतील अनेक भागात गौराईच्या मूर्ती वाजत-गाजत नाचत घरोघरी आणण्यात आल्या.

वसई : वसई तालुक्यात गौराईचे मंगळवार दुपारपासूनच पावसाच्या हजेरीत उत्साहाने स्वागत झाले. वसईतील अनेक भागात गौराईच्या मूर्ती वाजत-गाजत नाचत घरोघरी आणण्यात आल्या. यंदा तालुक्यात २ हजार २४५ गौराईंचे आगमन झाले आहे.वसई तालुक्यात आगरी, कोळी समाजात गौराईचा सण उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी गौराईची मूर्ती नाचत, वाजत गाजत मिरवणुकीने आणली जाते. ही परंपरा यंदाही मुसळधार पाऊस कोसळत असतानाही कायम होती.वसईत तालुक्यात यंदा २ हजार २४५ गौराई आल्या आहेत. त्यात ४२ सार्वजनिक तर २ हजार २०३ घरगुती गौराईंचा समावेश आहे. वसई तालुक्यातील कामण, पोमण, चंद्रपाडा, ससूनवघर, मालजीपाडा. जुचंद्र, टिवरी राजावली, दिवाणमान, चुळणे या आगरी बहुसंख्य असलेल्या गावांमध्ये गौराईंचा सण उत्साहाने साजरा केला जातो. त्याचबरोबर किनारपट्टींवरील कोळी समाजाच्या घरी गौराईचे धुमधडाक्यात आगमन होते. अनेक घरांमध्ये गौराईंच्या मूर्तींची आज स्थापना झाली. गौराईच्या पूजेसाठी गेल्या दोन दिवसांपासूनच वसईतील बाजारपेठा गजबजल्या होत्या. गौराईची मूर्ती आणि पूजेच्या साहित्याला यंदा महागाईची झळ बसली होती. त्यानंतरही भाविकांनी गौराईच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती.गौरीचे प्रतिकात्मक पूजन तेरड्याच्या रोपट्यानेडहाणू : गौरी म्हणून तेरड्याच्या रोपट्याची प्रतिकात्मक पुजा करण्याची प्रथा आजही येथे कायम आहे. या पारंपरिक पूजनाला स्थानिकांकडून मोसमी फळाफुलांचा वापर केला जातो. त्यामुळे ही जमवाजमव करण्यासाठी या सणाच्या दिवशी सुवाशिंनींची लगबग दिसून आली. गौरीच्या निमित्ताने घरच्या माहेरवाशिनी घरोघरी आल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.मागील काही वर्षांपासून तालुक्यातील शहरी भागात गौरीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याकडे कल वाढत आहे. मात्र खेडोपाडी तेरड्याच्या रोपट्याचीच प्रतिकात्मक पुजन करण्याची प्रथा आहे. या करिता माळरानावर उगवलेली रोपटी गौरी आगमनाच्या दिवशी न आणता पूजनाच्या दिवशी आणली जातात. शिवाय पूजन तसेच सजावटीकरिता विविध रानफुले आणण्यासाठी लहान मुली आणि सुवाशिणी शोधाशोधकरीत फिरताना दिसतात.सायंकाळी या प्रतिकात्मक गौरीचे दारात औक्षण करण्यात आले. काठपदरी साडी आणि विविध दागिन्यांनी सजावट करण्यात आली होती. त्यानंतर कणकेत कुंकू किंवा हळद मिक्स करून घट्ट द्रावण करुन हाताच्या मुठी बुडवून पावलांप्रमाणे ठसे उमटवून संपूर्ण घरभर गौरीचा संचार घरोघरी पहावयास मिळाला. त्यामागे घरात सुख-समृद्धी नांदते अशी मान्यता आहे.देवघरात गौरीचे विधिवतपूजन केल्यानंतर आरती, नैवेद्य अर्पण केला जातो. विविध स्थानिक भाज्यांचा वापर नैवेद्यासाठी केला जातो. मात्र, काही ठिकाणी मटण आणि माशांचा नैवेद्यही दिला जातो.रात्रभर जागरण करून ग्रामीण ढंगाची पारंपरिक गाणी गायली जायची, मात्र हल्ली हिंदी-मराठी चित्रपट गाण्यांची भर पडली आहे. या काळात महिला एकमेकींच्या घरी दर्शनासाठी जाऊन परस्परातील नातं अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करतात. यावेळी माहेरवाशिणी घरी येत असल्याने उत्साहाचे वातावरण आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव