शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅलेंटाइन डे ला २० जोडपी अडकणार विवाहबंधनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 00:10 IST

आकडा वाढण्याची शक्यता : विवाह नोंदणी कार्यालयात जय्यत तयारी, कर्मचाऱ्यांसह वेळ वाढवणार

ठाणे : लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी प्रेमीयुगुलं चांगल्या मुहूर्ताची प्रतीक्षा करीत असतात. व्हॅलेंटाइन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस. त्यामुळे हा दिवस सर्वाधिक शुभ मानून या दिवशी विवाहबंधनात अडकण्यासाठी २० प्रेमीयुगुलांनी नोंदणी केली आहे. मात्र, आकडा वाढू शकतो, अशी माहिती जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयाने दिली.नवीन वर्ष, अक्षयतृतीया किंवा अन्य एखादा शुभमुहूर्त असो वा व्हॅलेंटाइन डे यादिवशी प्रेमीयुगुलं विवाहबंधनात अडकण्यासाठी उत्सुक असतात. व्हॅलेंटाइन डे आणि प्रेमिकांचे अतूट नाते आहे. १४ फेब्रुवारीला जगभर हा दिवस जल्लोषात साजरा होतो. या दिवसाची प्रेमीयुगुल आतुरतेने वाट पाहत असतात. यानिमित्ताने शहरातील दुकाने गुलाब, लाल रंगांची हृदयाची प्रतिमा, भेटवस्तू, तसेच चॉकलेटने सजलेली असतात. याच दिनी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले लव्हबर्ड्स लग्न करण्याचा मुहूर्त साधतात. जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात दररोज हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच विवाहासाठी जोडपी येतात; पण व्हॅलेंटाइन डे म्हणजेच १४ फेब्रुवारीला जिल्ह्यातील २० जोडपी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. गेल्यावर्षी या दिवशी ३६ जोडपी, २०१८ मध्ये २२, तर २०१७ मध्ये ३० जोडपी लग्नबंधनात अडकली होती. अनेक जण नववर्षाच्या पहिल्या तारखेलाही विवाहबंधनात अडकतात. १ जानेवारी २०२० रोजी २२ जोडप्यांनी विवाह केल्याची माहिती जिल्हा नोंदणी विवाह कार्यालयाने दिली.जोडप्यांच्या सोयीसाठी अतिरिक्त वेळ : जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात विवाहेच्छुक जोडप्यांना आॅनलाइन पद्धतीने नोंदणी करण्याची सुविधा २०१६ पासून उपलब्ध करून दिली आहे. एक महिना आधी या जोडप्यांना नोटीस द्यावी लागते आणि तीन महिन्यांच्या कालावधीत ते कधीही कार्यालयात येऊन विवाह करू शकतात. १४ फेब्रुवारीसाठी २० जोडप्यांनी नोंदणी केली आहे. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही कर्मचारी आणि वेळदेखील वाढवणार आहोत, अशी माहिती विवाह अधिकारी अनिल गायकवाड यांनी लोकमतला दिली.