शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

येत्या रविवारी वसईत चौथे श्रीमंत नरवीर चिमाजी अप्पा साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 02:44 IST

वसई : शब्दवेल साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने वसई येथे चौथ्या श्रीमंत नरवीर चिमाजी अप्पा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

वसई : शब्दवेल साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने वसई येथे चौथ्या श्रीमंत नरवीर चिमाजी अप्पा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. माणगाव येथील प्रेरणा ग्रुपची संकल्पना असलेली पर्यावरणाची मंगळागौर हा सांस्कृतिक कार्यक्रम या संमेलनाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.ज्येष्ठ साहित्यिका उर्मिला पवार या संमेलनाच्या उद्घाटक आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री, गायिका कट्यार फेम फैय्याज शेख संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत, अशी माहिती शब्दवेलच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी बनसोडे-परुळेकर यांनी दिली. वसई पारनाका येथील काँग्रेस भवनाच्या वर्तक सभागृहात २६ नोव्हेंबरला हे संमेलन भरणार आहे. वसई विरार महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती भारती देशमुख स्वागताध्यक्षा आहेत. महापौर प्रवीणा ठाकूर, पर्यावरण तज्ञ डॉ. नंदकुमार मोघे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. लोककवी प्रशांत मोरे कवी संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत. सुप्रसिद्ध निवेदक कुणाल रेगे संमेलनाचे सूत्रसंचालन करणार आहेत, अशी माहिती पल्लवी बनसोडे यांनी दिली.संमेलनात शब्दवेल स्मृतीशलाकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच कला व साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट कामागिरी केलेल्या दत्ता सामंत, काशिनाथ बावीस्कर, अ‍ॅड. रमाकांत वाघचौडे, कृष्णाबाई राठोड, शंकर मोदगेकर, सुभाष गोंधळे यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.>अनोखा कार्यक्रममाणगावच्या प्रेरणा ग्रुपच्या संकल्पनेतून पर्यावरणाची मंगळागौर हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून पर्यावरण विषयाला वाहिलेला हा अनोखा कार्यक्रम असणार आहे. दुपारच्या सत्रात ज्येष्ठ अभिनेत्री फैय्याज यांची मुलाखत प्रदीप देसाई घेणार आहेत. चित्रकार सुभाष गोंधळे व्यक्तीचित्रण प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. काव्य संमेलनाच्या दोन सत्रांमध्ये खार येथील अनुयोग विद्यालयाचे विद्यार्थी पथनाट्य सादर करणार आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार