शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

वसईकरांवर सरणावर लाकडे रचण्याची पाळी, कर्मचाºयांअभावी अंत्यविधीसाठी होते परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 05:39 IST

वसई विरार महापालिकेच्या अनेक स्मशानभूमीत लाकडांची टंचाई आहे. तर कर्मचारी नसल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांनाच दूरुन लाकडे आणून सरणावर रचावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

- शशी करपे वसई : वसई विरार महापालिकेच्या अनेक स्मशानभूमीत लाकडांची टंचाई आहे. तर कर्मचारी नसल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांनाच दूरुन लाकडे आणून सरणावर रचावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. तर याठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याचेही समोर आले आहे.अंत्यविधीसाठी वसईकरांची परवड होत असल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला. सुनिल तिवारी यांचे निधन झाल्याने अंत्यविधीसाठी त्यांचे पार्थिव एव्हरशाईन येथील स्मशानभूमीत नेले होते. त्याठिकाणी पोचल्यानंतर स्मशानात लाकडे नसल्याचे तेथील कर्मचाºयाने सांगितले. यावेळी उपस्थित असलेले मनसेचे प्रशांत खांबे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह लाकडांसाठी सोपारा पश्चिम आणि तुळींज स्मशानभूमीत धाव घेतली. तुळींज स्मशानभूमीत लाकडे उपलब्ध नसल्याचे तेथील कर्मचाºयांनी सांगितले. तर सोपारा येथील स्मशानभूमीतील लाकडे ओली असल्याचे निमित्त सांगण्यात आले, अशी माहिती खांबे यांनी दिली.तब्बल एक तास हिंडल्यानंतर खांबे आपल्या सहकाºयांसह स्मशानभूमीत आले असता रस्त्यावर स्मशानभूमीच्या बाहेर ओली लाकडे ठेवण्यात आल्याचे त्यांना दिसले. पण, लाकडे सरणापर्यंत घेऊन जाण्यासाठी स्मशानभूमीत एकही कर्मचारी नव्हता. अखेर खांबे यांचे सहकारी तिवारी यांच्या नातेवाईकांनी दूरवर असलेली लाकडे स्मशानात नेऊन स्वत: चिता रचली. ही लाकडे ओली असल्याने पुढचा त्रास त्यांना सहन करावा लागला.हे कमी म्हणून की काय त्या स्मशानभूमीत हातपाय धुवायलाही पाणी नव्हते. स्मशानात पाण्याची तीव्र टंचाई असते. अनेक लोक अंत्यविधीपूर्वी आणि नंतर स्नान करतात. नातेवाईक हातपाय धुतात. पण, याठिकाणी कधीच पाणी उपलब्ध नसते, असे खांबे यांनी सांगितले.दरम्यान, याप्रकरणी खांबे यांनी थेट आयुक्तांनाच तक्रार केली. स्मशानात लाकडे उपलब्ध होती. एव्हरशाईन स्मशानभूमीत टेम्पो आत जात नसल्याने लाकडे रस्त्याकडेला ठेवण्यात आली होती. लाकडे आतमध्ये नेण्यात येणार होती, अशी सारवा सारव आयुक्त सतीश लोखंडे यांनी तक्रारीनंतर केली. पाचूबंदर येथील स्मशानभूमीला रात्री अकरा वाजता टाळे लावून कर्मचारी गायब झाला होता. तेव्हा बालकाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांना मृतदेह मांडीवर ठेऊन तब्बल दोन तास ताटकळत बसावे लागल्याचे प्रकार लोकमतने यापूर्वी चव्हाट्यावर आणला होता.

टॅग्स :Governmentसरकार