शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तन, वसईचे नाखवा दर्यावर !

By admin | Updated: August 6, 2015 02:50 IST

समुद्रातील वादळी वारे व तुफानी लाटांच्या पार्श्वभूमीवर पालघर, डहाणू, वसई तालुक्यांतील मच्छीमारांनी ११ आॅगस्टनंतर समुद्रात मासेमारीला जाण्याचे

पालघर : समुद्रातील वादळी वारे व तुफानी लाटांच्या पार्श्वभूमीवर पालघर, डहाणू, वसई तालुक्यांतील मच्छीमारांनी ११ आॅगस्टनंतर समुद्रात मासेमारीला जाण्याचे एकमताने ठरविले होते. मात्र, अधिक मासे मिळण्याच्या हव्यासापोटी उत्तन, वसई भागातील काही मच्छीमारांच्या बोटींनी समुद्रात बोटी उतरविल्याने सातपाटी, मुरबे, डहाणू भागातील काही मच्छीमारांनी मासेमारीला जाण्यासाठी घेतलेले पास, परवाने देण्यासाठी संस्थांकडे तगादा लावला आहे.केंद्र व राज्य शासनाने घोषित केलेली १ जून ते ३१ जुलैपर्यंतची पावसाळी मासेमारीबंदी उलटल्यानंतर कस्टम विभागाने मासेमारीला जाण्यासाठी परवाने जारी केले आहेत. परंतु, समुद्रात अजूनही वादळी वारे व तुफानी लाटा उसळत असल्याने पालघर, डहाणू, वसई तालुक्यांतील सहकारी संस्थांनी एकमताने ११ आॅगस्टनंतर मासेमारीला जाण्याचा निर्णय घेतल्याचे काही मच्छीमार प्रतिनिधींनी जाहीर केले होते. परंतु, मच्छीमार सहकारी संस्था व सर्वोदय सहकारी संस्था या सातपाटीमधील दोन्ही सहकारी संस्थांनी डिझेल, बर्फ वितरण बंद करून पासेस देण्यास नकार दिल्याचे राजन तरे या मच्छीमाराने लोकमतला सांगितले. गेल्या वर्षी मासेमारी उत्पादन कमी झाल्याने अनेक मच्छीमार कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. समुदातील वादळी वाऱ्यांची सर्वांनाच भीती असते, परंतु सध्या वातावरण शांत असल्याने संस्थांनी पासेस दिल्यास अनेक मच्छीमार मासेमारीला जाण्यास तयार असल्याचे तरे यांनी सांगून वसई, उत्तन भागासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई भागातील अनेक ट्रॉलर्सही मासेमारीसाठी समुद्रात गेल्याने त्यांना तुम्ही कसे रोखणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात मच्छीमार सहकारी संस्थेचे चेअरमन राजन मेहेर यांच्याशी संपर्क साधला असता ११ आॅगस्टला मासेमारीला जाण्याचा निर्णय हा समुदात वित्तहानी व आर्थिकहानी होऊ नये, यासाठी सर्वानुमते घेण्यात आलेला निर्णय होता, त्याचे पालन एैच्छिक आहे असे सांगितले.