शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

ओमकार अकादमीत आदिवासींना यूपीएससीचे प्रशिक्षण मोफत

By admin | Updated: September 12, 2016 02:57 IST

युपीएससी आणि एमपीएससी या परीक्षांमधील यशाची द्वारे खुली करणारे प्रशिक्षण आदिवासी युवक, युवतींना खुली करून देणाऱ्या ओमकार अकादमीचे उद्घाटन झडपोली

हितेन नाईक,  पालघरयुपीएससी आणि एमपीएससी या परीक्षांमधील यशाची द्वारे खुली करणारे प्रशिक्षण आदिवासी युवक, युवतींना खुली करून देणाऱ्या ओमकार अकादमीचे उद्घाटन झडपोली येथे शनिवारी करण्यात आले. निलेश सांबरे यांनी तिचा शुभारंभ केला असून अशा स्वरुपाचा देशातला हा पहिलाच उपक्रम आहे. तिचे उद्घाटन तुलसीदास भोईटे यांच्या हस्ते तर तीमधील ग्रंथालयाचे उद्घाटन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रमाकांत पाटील व किरण शेलार यांच्या हस्ते पार पडले.जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे सूत्रधार निलेश सांबरे यांनी जिल्ह्यातील आदिवासी, गरीब अशा हुशार युवक व युवतींना आयएएस व आयपीएस अधिकारी बनविण्याचा दृढ निश्चय मनात बाळगला असून त्यांच्या अ‍ॅकेडमीमध्ये आलेल्या सुमारे ५०० विद्यार्थ्यांमधून ६० विद्यार्थ्यांची पहिली तुकडी निवडण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना हे संपूर्ण प्रशिक्षण तज्ज्ञ शिक्षकांद्वारे विनामूल्य देण्यात येणार असून सुसज्ज लायब्ररीहीआहे.सांबरे यांच्या घरात वैभव असतांना त्यांनी आपण ज्या भागात शिकलो, वाढलो तेथील आदिवासी आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना आयएएस आणि आयपीएस बनविण्यासाठी उचललेला वसा समाजासाठी आदर्श ठरणारा आहे असे गौरोवोद्गार मान्यवरांनी काढले.कार्यक्रमात पूर्वा भोईर या ८ वर्षीय मुलीने समाजाला प्रबोधन करणारे व्याख्यान दिले. जिजाऊ माँ शनि चौथऱ्यावर जाऊन शनी देवांचे दर्शन घेण्याचा हट्ट घेऊन बसल्या असत्या तर स्वराज्य निर्माण झाले नसते. अशी अनेक उदाहरणे देऊन प्रबोधन केले. प्राध्यापक सुनील माधव परदेशी, पत्रकार रमेश पाटील,विजय घरत, नितीन बोंबाडे आदि मान्यवरांसह विद्यार्थी,पालकवर्ग उपस्थित होते.