शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तहसील कार्यालयासमोर आज अनोखे होळी आंदोलन

By admin | Updated: March 10, 2017 03:32 IST

डिसेंबर २०१६ पासून फेब्रुवारी २०१७ या कालावधीत रोहयो वर काम करून घाम गाळलेल्या मजुरांना अजुन मजुरी मिळालेली नाही. अधिकारी वर्गाच्या अक्षम्य दिरंगाईमुळे

वाडा/ विक्रमगड/ जव्हार/मोखाडा : डिसेंबर २०१६ पासून फेब्रुवारी २०१७ या कालावधीत रोहयो वर काम करून घाम गाळलेल्या मजुरांना अजुन मजुरी मिळालेली नाही. अधिकारी वर्गाच्या अक्षम्य दिरंगाईमुळे या मजुरांवर ऐन सणासुदी उपासमारीची वेळ आली आहे. ऐन होळीच्या सणाच्या तोंडावर मजुरांना पैसे आदिवासी मजुरांवर सरकार आणि प्रशासन अन्याय करत आहे. याबाबत श्रमजीवी संघटना आता आक्र मक झाली असून येत्या १० मार्च रोज पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्र मगड, जव्हार इत्यादी तहसील कचेऱ्या बंद पाडून कार्यालयासमोर छोटी (बारकी) होळी पेटवून सरकारचा निषेध कणार आहे.या भागात कुपोषण नसून रोजगार हमी योजना देखील प्रभावी आहे असे ठासून सांगणाऱ्या सरकारच्या कार्यपद्धतीचे पार धिंडवडे निघाले आहेत. पालघर जिल्ह्यात गेले चार महिने मजुरांच्या घामाचे कष्टाचे पैसे सरकार देत नसल्याने हे सरकार भिकारडे सरकार असल्याचा गंभीर आरोप श्रमजीवी संघटनेकडून करण्यात आला आहे. एकीकडे काम देऊन मजुरी देत नाही तर दुसरीकडे कामाची मागणी करूनही काम मिळत नाही. एकट्या विक्र मगड तालूक्यात ७५५ मजुरांनी कामाची मागणी केलेली मात्र त्यांना काम देण्यात प्रशासन अकार्यक्षम ठरले. या मजूरांनी अखेर बेकार भत्याची मागणी केली आहे. शासन आणि प्रशासनाच्या या बेजबाबदार धोरणामुळे येथील मजुरांवर सद्यस्थितीत अक्षरश: उपासमार ओढवली आहे. (वार्ताहर)राज्य सरकारला पोस्त म्हणून कोंबडीश्रमजीवी संघटनेने याबाबत अनेक पत्र अर्ज विनंत्या करून देखील प्रशासन आपली कार्यपद्धती बदलत नाही. १० मार्च रोजी होणाऱ्या या अन्याया विरोधात तहसील कार्यालयांसमोर होळी पेटवली जाणार आहे. आदिवासी समाजात होळी या सणाला फार महत्व आहे. समाजातील अनिष्ट प्रथा, वाईट रूढी आणि इडा- पीडा या होळीत भस्म व्हावी अशी मानिसकता आहे, म्हणूनच सरकार ला सुबुद्धी मिळावी आणि याभागातील भ्रष्टाचार, अपहार गैर कारभार, या भागातील गरिबांची भूक, आदिवासीबाबतची सरकारची असंवेदनशिलता या वाईट गोष्टी या होळीत भस्म व्हाव्यात या मागणीसाठी हे अभिनव आंदोलन करून येथील मजूर आदिवासी परंपरेप्रमाणे शासनाला आणि राज्य सरकारला कोंबडी पोस्त (भेट) म्हणून देणार आहेत. यासाठी प्रत्येक तहसील कचेरीत हजारो मजूर सहभागी होणार आहेत.