शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात व्यक्तीने चावा घेऊन तोडले कान

By admin | Updated: January 23, 2016 23:29 IST

आपल्या शेतात भाजीपाला काढत असलेले चंद्रकांत गोरेकर (५५) रा. कमारे वावेपाडा यांनी आपल्या शेतातून पळणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीला पकडून हटकले असता त्याचा राग येऊन

पालघर : आपल्या शेतात भाजीपाला काढत असलेले चंद्रकांत गोरेकर (५५) रा. कमारे वावेपाडा यांनी आपल्या शेतातून पळणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीला पकडून हटकले असता त्याचा राग येऊन त्यानी शेतकऱ्यांच्या कानाला चावा घेऊन कान डोक्यापासून वेगळा केला. पोलीसांनी या अज्ञाताला ताब्यात घेऊन उपचारासाठी पालघरच्या ग्रामीण रूग्णालयात नेले असता आज सकाळी त्याचा मृत्यू झाला.पालघरच्या पूर्वभागातील कमारे येथील आपल्या शेतात शुक्रवारी संध्याकाळी शेतकरी गोरेकर मेथी, पातीकांदा इ. भाजीपाला काढत असताना शेतात लावलेल्या भाजीपाल्यावरून तो अज्ञात इसम धावत जात असताना त्या शेतकऱ्याने त्याला पकडून हटकले. त्यामुळे त्या अज्ञात ४० ते ४५ वर्षीय व्यक्तीने शेतकऱ्याला खाली पाडून त्याच्या डाव्या कानाला जोरदार चावा घेतला. त्याचा कान डोक्यापासून वेगळा केल्यानंतर त्याने धुम ठोकली. रक्तबंबाळ अवस्थेत शेतकऱ्याला उपचारासाठी पालघरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले तर कमारे येथील नागरीकांनी त्या अज्ञात व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने नागरीकांवर दगडांचा वर्षाव केला. परंतु नागरीकांनी त्याला पकडून पोलीसांच्या हवाली केले. त्याला उपचारासाठी पालघरच्या ग्रामीण रूग्णालयात नेले असताना त्याचा शनिवारी सकाळी अचानकपणे मृत्यू झाला. (प्रतिनिधी) मनोरुग्ण असल्याचा तर्क या प्रकरणी पालघर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश दुम्पल पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्या रूग्णाच्या पोस्टमार्टमदरम्यान त्याचे लिव्हर खराब होऊन त्याला टी. बी चा आजार असावा अथवा त्याला अंमली पदार्थांचे व्यसन असल्याने वेडापिसा झालेला. त्या मनोरूग्ण व्यक्तीने हे कृत्य केले असावे असा तर्क व्यक्त केला. तसेच त्याला काल रात्री ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटल मध्ये पाठविण्याची प्रक्रिया सुरू असतानाच त्याचा आज सकाळी अचानक मृत्यू झाल्याचेही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.