शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘संयुक्त महाराष्ट्र लढा व्हाया लोककला’

By admin | Updated: April 29, 2017 01:18 IST

येथील विद्यार्थी भारती संघटना दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र दिनानिमित्त वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित उपक्रम आयोजित करत असते.

सफाळे : येथील विद्यार्थी भारती संघटना दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र दिनानिमित्त वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित उपक्रम आयोजित करत असते. हे कार्यक्र माचे चौथे वर्ष असून या वर्षी ‘संयुक्त महाराष्ट्र लढा व्हाया लोककला’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अशी माहिती कार्यक्र म प्रमुख मोनाली भोईर व ज्योती निकाळजे यांनी दिली आहे.सर्वांसाठी मोफत असणारा हा कार्यक्र म दि. १ मे रोजी सायं.४ वा. मराठी शाळा क्र .१, नारोडा, सफाळे (पू) येथे होणार असून या कार्यक्र माचे उद्घाटक शाहीर इंद्रायणी आत्माराम पाटील यांच्या हस्ते होणार असून कार्यक्र माचे प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ लेखक राजन खान व गणाई संस्थापक किशोर जगताप हे उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्र मास मराठी भारतीचे अध्यक्ष ज्योती बडेकर, विद्यार्थी भारती राष्ट्रीय अध्यक्षा पूजा बडेकर, राज्याध्यक्षा विजेता भोनकर, गणाई प्रमुख राहुल घरत व कार्यक्र माचे संकल्पनाकार विद्यार्थी भारती राज्य संघटक स्वप्नील तरे हे उपस्थित राहणार असल्याचे विद्यार्थी भारती पल्लवी पाटी यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.या कार्यक्रमात पोवाडे, लावणी, काही ठराविक लोककलांच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील काही क्षण अनुभवायला मिळणार आहेत. त्यासाठी सदानंद राणे दिग्दिर्शत ‘सांस्कृतिक जागर’ या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जे हुतात्मा झाले त्यांच्या कुटुंबियांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासोबत पालघर भूषण, उत्कृष्ट कार्यकर्ता असे अनेक पुरस्कार देण्यात येणार आहेत.(वार्ताहर)