शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी कला, संस्कृतीचे अनोखे दर्शन

By admin | Updated: November 28, 2015 22:29 IST

डहाणू तालुक्यातील मुरबाड येथे श्री गावदेवी मंडळ मुरबाड व बहुजन विकास आघाडी यांच्यातर्फे आदिवासी कला आणि सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथे परिसरातील

कासा : डहाणू तालुक्यातील मुरबाड येथे श्री गावदेवी मंडळ मुरबाड व बहुजन विकास आघाडी यांच्यातर्फे आदिवासी कला आणि सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथे परिसरातील आदिवासी तरूणांनी विविध कला व नृत्य सादर करून आदिवासी कलेचे दर्शन घडवून उपस्थित प्रेक्षकांना भारावून टाकले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.आदिवासी तरूणांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यातुन नावारुपाला येणारे कलाकार घडावेत आणि आदिवासींची कला व संस्कृतीची जोपासना होवून समाजातील इतर लोकांपर्यंत पोहोचवावी या मुख्य उद्देशाने बहुजन विकास आघाडी व मुरबाडच्या श्री गावदेवी मंडळातर्फे झालेल्या या कार्यक्रमात आदिवासी तरूणांनी मोठ्या संख्येने भाग घेवून प्रतिसाद दिला. डहाणू, वाणगांव, कासा परिसरातून कला पथके, नृत्य कलाकार सहभागी झाले होते. यावेळी आदिवासींनी तारपा नृत्य, कांबड्या नृत्य, टिपरी नृत्य, ढोलनाच, घोरनाच असे एकापेक्षा एक दर्जेदार नृत्य सादर केली. कधीही न बघितलेले डान्स, नृत्याचे प्रकार पाहून सर्व कलाकारांचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले व सहभागी कलाकारांना प्रोत्साहनपर बक्षिसेही दिली.कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आ. मनिषा निमकर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. विलास तरे, प्रमुख पाहुणे माजी खा. बळीराम जाधव, नगरसेवक रमेश घोरकाना, राजेश पाटील तर विशेष अतिथी चित्रपट अभिनेते रणजित हेमंत बिर्जे, गुरू बचन सिंग या वेळी उपस्थित होते. कलाकारांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यासाठी रफिक घाची, किशोर बरड, अरूण निकोले, चंदू घाटाळ, सुंदर मोर आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)