शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

कुरगावमधील गाळे अनधिकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 07:05 IST

ग्रामपंचायतीवर ठपका : पालघर तहसीलदारांची भूमिका ठरणार महत्वाची

बोईसर : पालघर तालुक्यातील कुरगाव ग्रामपंचायतीने पाचमार्ग नाक्यावर मार्केटसाठी गाळे बांधताना संबंधित खात्याची परवानगी न घेतल्याने ते अनिधकृत असल्याचे पालघर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी सुनावणीनंतर निर्णय दिला आहे.

गाळे बांधण्यात आलेली जागा ही आता महाराष्ट्र शासनाच्या नावे असली तरी १९५४ साली ग्रामपंचायतीच्या नावे होती. त्यामुळे तहसीलदारांची भूमीका महत्वाची ठरणार आहे. कुरगांव ग्रामपंचायतीने सर्व्हेे नंबर १७९ मध्ये वर्ष १९८९-९० साली बांधलेल्या अकरा गाळ्यांबाबतची तक्रार तारापूरचे पंचायत समिती सदस्य सुशिल चुरी यांनी २९ सप्टेंबर २०१८ च्या मासिक सर्वसाधारण सभेत उपस्थित केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने पंचायत समिती स्तरावर संबंधिताची सुनावणी घेऊन निर्णय दिला आहे.

गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे यांनी दिलेल्या निर्णयामध्ये ते बांधकाम करतेवेळी जागेची खातरजमा करणे आवश्यक होते. मात्र, सध्या स्थितीत जागेबाबत तक्रार उपस्थित झाल्यानंतर ती जागा ही महाराष्ट्र शासनाच्या नावे आढळून आली आहे. गाळ्याचे बांधकाम करीत असताना संबंधित खात्याची परवानगी घेऊन बांधकाम करणे आवश्यक होते तसेच, सर्व संबंधितांची जागेची मालकीची खातरजमा करणेही गरजेचे होते. त्यामुळे सदर चे बांधकाम अनधिकृत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे नमूद केले आहे. मात्र, तरी शासन निर्णय महसूल व वनविभाग यांचे शासन परिपत्रक क्र मांक जमीन ०३/ २००९/ प्र क्र /१३/ डज - १/ दिनांक ७ सप्टेंबर , २०१० तसेच महसूल व वन विभाग यांचे शासन परिपत्रक क्र मांक जमिन ०७/२०१३/ प्रक्र ३७३ / प १/ दिनांक १० आॅक्टोंबर, २०१३ नुसार व सरपंच, ग्रामपंचायत कुरगांव यांनी यापूर्वी केलेला पत्रव्यवहार याबाबतीत तहसीलदार पालघर यांना त्यांचे स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली आहे. यामुळे तहसिलदार या संदर्भात काय भूमिका घेतात त्याकडे कुरगांव वासीयांचे लक्ष लागले आहे.जिल्हा परिषदेने दिलेल्या अंदाजपत्रकानुसार गाळे बांधकाम करण्यात आले आहेत. रितसर लिलाव पद्धतीने भाडेतत्वार ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने देण्यात आलेले आहेत. मार्केट गाळ्यांचे बांधकाम केलेल्या जागा १९५४ पासून कुरगांव ग्रामपंचायतीच्या ताब्यात होती. त्यानंतर ती महसूल विभागाने ताब्यात घेतल्याने त्यावरील बांधकाम व सदरची जागा ग्रामपंचायती कडे हस्तांतरीत होण्यासाठी महसुल विभागाकडे मागणी केली आहे.-मयुर पाटील, ग्रामसेवक, कुरगांव ग्रामपंचायतशासकीय योजनांच्या निधीचा गैरवापर करून परवानगी न घेता गाळे बांधण्यात आले असून बांधलेल्या गाळ्यापैकी एकही गाळा गोरगरिबांना देण्यात आला नाही, याबाबत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी-सुशील चुरी,सदस्य, पंचायत समिती पालघर

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMumbaiमुंबई