शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत कोळंबी प्रकल्प उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 00:25 IST

वसईतील भुईगाव येथे महसूल व पालिका प्रशासनाची कारवाई

वसई : भुईगाव खारटन भागातील पाणथळ जमिनीत अनधिकृतपणे उभारलेले कोळंबी प्रकल्प व चाळी कोकण आयुक्त यांच्या आदेशाने बुधवारी निष्कासित करण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती याचिकाकर्ते तथा पर्यावरण संवर्धन समितीचे समीर वर्तक यांनी ‘लोकमत’ला दिली. शासनाने अनधिकृत प्रकल्पांवर कारवाईसाठी कोकण विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. त्यानंतर कोकण आयुक्त यांच्या आदेशानुसार तोडू कारवाईचे आदेश वसई महसूल व महापालिका प्रशासनास दिले होते. त्यानुसार बुधवारी सकाळीच या कारवाईस सुरुवात झाली. यामध्ये वसई महसूल विभागाचे प्रांत, तहसीलदार आणि वसई-विरार महापालिका प्रशासन यांचे उपायुक्त व नगररचना विभाग तसेच पोलीस कर्मचारी सहभागी झाले आहेत. या कारवाईसाठी २०० पेक्षा जास्त पोलीस ताफा, ३० बुलडोझर, ट्रॅक्टर, अग्निशमन दल आदी मोठा फौजफाटा कारवाईच्या ठिकाणी सज्ज झाला होता. पर्यावरण संवर्धन समितीचे समीर वर्तक, फ्रान्सिस डिसोझा, मॅकेन्झी डाबरे व पर्यावरण संवर्धन समिती यांनी कारवाईसाठी मागणी केली होती.पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या वसईच्या पश्चिम पट्ट्यातील पाणथळ जागा व कांदळवने वाचावी म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. मा. मुंबई उच्च न्यायालयात वनशक्ती संस्थेच्या माध्यमातून दाखल जनहित याचिकेवरील आदेशानुसार ही निष्कासन कारवाई होत आहे. या कारवाईचे आम्ही पर्यावरणप्रेमी म्हणून स्वागत करीत आहोत.- समीर वर्तक, पर्यावरण संवर्धन समिती समन्वयक, वसई