शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

बोगस कागदपत्रांच्या आधारे अनधिकृत हॉटेल, तीन जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 05:13 IST

बनावट कागदपत्राच्या आधारे अलिशान हॉटेल बांधून शासनाची फसवणूक करणाऱ्या तिघांविरुद्ध कासा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कासा : आदिवासी मालकी जागेवर तहसील कार्यालयाचा बोगस बिनशेती दाखला तयार करून बनावट कागदपत्राच्या आधारे अलिशान हॉटेल बांधून शासनाची फसवणूक करणाऱ्या तिघांविरुद्ध कासा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कासा पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दोघेजण फरार आहेत.डहाणू तालुक्यातील मुंबई - अहमदाबाद महामार्गावर धानीवरी येथे आदिवासी व वनविभागाच्या जागेत रोजगार्डन हे आलिशान हॉटेल बांधले आहे. या बांधकामाबाबत स्थानिक ग्रामपंचायीत ना हरकत दाखल्यासाठी अर्ज केला असता स्थानिकांच्या विरोधामुळे ग्रामपंचायतीने हा दाखला देण्यास नकार दिला. मात्र, त्यानंतरही हॉटेलचे बांधकाम केल्याने येथील रहिवाशांनी डहाणू तहसीलदारकडे तक्रार केली. ती मिळाल्यावर डहाणू तहसीलदारांच्या आदेशाने प्रत्यक्ष पाहणी करून कागदपत्रे तपासली. तेव्हा हॉटेल मालकाने इतर दस्तावेजासह डहाणू तहसील कार्यालयाच्या परवानगी दाखल्याच्या झेरॉक्स प्रती, कागदपत्रे सादर केली. तेव्हा, तहसील कार्यालयाचा बिनशेतीचा दाखला बोगस असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हे बनावट दस्तावेज बनवल्याप्रकरणी कासा मंडळ अधिकारी प्रल्हाद खेडकर यांनी कासा पोलीस ठाण्यात हॉटेल मालक हबीबउल पटेल (रा.जोगेश्वरी, मुंबई), जमीन व्यवहार करणारे भालचंद्र वझे (रा.दापचरी) आणि विनोद मानकर (रा.डहाण)ू यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाल्यावर भालचंद्र वझे यांना पालघर मार्केट येथून अटक केली. दोन आरोपी फरार असून हबीबउल पटेल यांनी पालघर कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी केलेला अर्ज फेटाळला आहे.

या संदर्भात तक्रार आल्यानंतर धानिवरी येथील हॉटेलच्या जमिनीची कागदपत्रे तपासली असता ती बनावट असल्याचे निदर्शनास आले. यानंतर संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले.- राहुल सारंग, तहसीलदार, डहाणू.आरोपींनी बनविलेल्या जागेच्या बनावट कागदपत्रांची मूळ प्रत मिळविली असून, एका आरोपीला पकडले आहे, तर दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.- आनंदराव काळे, सहायक पोलीस निरीक्षक, कासा.