शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामे सुरूच!

By admin | Updated: September 11, 2015 23:12 IST

वसई-विरार शहर महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामावर नियंत्रण आणण्यात अपयशी ठरलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे.

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामावर नियंत्रण आणण्यात अपयशी ठरलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे. परंतु त्यानंतरही शहराच्या अनेक भागात हजारो अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरूच आहे. या बांधकामाला वीज, पाणी व अन्य नागरी सुविधाही मिळत असतात. त्यामुळे अधिकाऱ्यावरील निलंबनाची कारवाई ही जनतेच्या डोळ्यात धुळफेक असल्याची चर्चा आहे.५ वर्षापुर्वी मुंबई उच्च न्यायालयाने वसई विरार उपप्रदेशातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासंदर्भात महानगरपालिका, ग्रामपंचायती व अन्य प्रशासकीय यंत्रणांना आदेश दिले होते. त्यानुसार काही काळ ही मोहिम प्रभावीरित्या राबवण्यात आली. मात्र कालांतराने ही मोहिम बासनात गुंडाळली गेली. त्यामुळे चाळमाफीया आणि भुमाफीयांचे चांगलेच फावले. दोन ते अडीच वर्षे अनधिकृत बांधकामाविरोधातील मोहिम थंडावल्यामुळे चाळमाफीयांनी पुन्हा डोके वर काढले व पुन्हा हजारो अनधिकृत इमारती सरसकट उभ्या राहील्या. यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांनी मनपा प्रशासनावर आसुड ओढल्यानंतर आयुक्तांनी संबंधीत प्रभारी सहा. आयुक्त व लिपीक यांना निलंबीत करण्याचे सत्र सुरू केले आहे. अनेकजण निलंबित झाल्यानंतरही अनधिकृत बांधकामाचे पीक मात्र सुरूच राहीले आहे. त्यामुळे प्रशासनाने या अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)