शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाच्या नोटा वापरून फसवणुकीचे प्रकार 

By धीरज परब | Updated: December 4, 2023 18:44 IST

अनेकदा पोलीस आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचतात तेव्हा पैसे देण्यासाठी चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाच्या नोटांचा वापर करतात.

मीरारोड - अनेकदा पोलीस आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचतात तेव्हा पैसे देण्यासाठी चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाच्या नोटांचा वापर करतात. पण आता काही भामट्यांनी असली नोटांसारख्या दिसणाऱ्या त्या चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाच्या नोटांचा वापर लहान दुकानदार आदींना गंडवण्यासाठी चालवल्याचे प्रकार शहरात घडत आहेत. स्टेशनरी दुकानात भारतीय चलनातील नोटा सारख्या रंगसंगती व छपाई असलेल्या चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाच्या नोटा सहज विकत मिळतात. त्या नोटांवर क्रमांक नसतो  लाल अक्षराने शाळा प्रकल्प वापरासाठी असे देखील लिहलेले असते. असली नोट पेक्षा ह्या नोट चा कागद पातळ असतो तसेच छपाईचा रंग हा चमकदार नसतो. परंतु ह्या खेळण्यातील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नोटांचा वापर आता लोकांना ठकवण्या साठी काही भामट्यांनी सुरु केला आहे. 

भाईंदरच्या एका स्टॉल चालकास देखील असाच अनुभव आला. शनिवारी रात्रीच्या वेळी स्टॉल वर काहीशी गर्दी पाहून एका इसमाने १०० रुपयांची घडी केलेली नोट चालकाच्या समोरील बरणी वर ठेवली. त्याने १० रुपयाची वस्तू मागितली व वस्तू आणि वरची ९० रुपये लवकर द्या, बस चालली आहे असे त्याने सांगितले. स्टॉल चालकाने देखील ती घडी केलेली नोट १०० रुपये समजून गल्ल्यात ठेवली आणि १० रुपयांची वस्तू देऊन वरचे ९० रुपये त्याला परत केले. 

रात्री स्टॉल बंद करते वेळी चालकाने नोटा मोजण्यास घेतल्या असता ती घडी केलेली १०० रुपयांची नोट उघडली असता ती खोटी चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाची असल्याचे आढळून आले. दरम्यान अश्या प्रकारे चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाच्या खोट्या नोटा वापरुन लोकांना फसवले जात असल्याचे प्रकार अन्यत्र सुद्धा घडल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. वेश्या व्यवसाय चालवणाऱ्याना पकडण्यासाठी अनेकदा पोलीस हे बनावट गिऱ्हाईक सह त्या आरोपीला पकडण्यासाठी दिल्या जाणाऱ्या रकमेत ह्या चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाच्या नोटांचा वापर करत असतात. बंडल मध्ये वरची आणि खालची नोट खरी ठेवायची आणि आतील नोटा ह्या चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाच्या ठेवतात. पण आता मुलांच्या खेळण्यातील नोटांचा वापर  लहान-सहान दुकानदार आदींना हेरून फसवणुकीसाठी केला जात असल्याचे प्रकार पाहून पोलीस अधिकारी देखील अचंबित झाले आहेत. लोकांनी लहान - मोठ्या रकमेच्या नोटा घेताना त्या तपासून घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.   

टॅग्स :Vasai Virarवसई विरारmira roadमीरा रोड