शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भुरळ घालणा-या दोन भामट्यांना अखेर अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 04:24 IST

चटाळे येथील मधुकरनगर येथून पायी जात असतांना पत्ता विचारायच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि मोबाईल असा ऐवज चोरून नेणा-या दोन भामट्यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.के एस हेगाजे यांनी अटक केली.

पालघर : चटाळे येथील मधुकरनगर येथून पायी जात असतांना पत्ता विचारायच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि मोबाईल असा ऐवज चोरून नेणा-या दोन भामट्यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.के एस हेगाजे यांनी अटक केली.ते १५ सप्टेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास पायी स्कूटरवरून आलेल्या दोन भामट्यांनी एडवणकडे जाणारा रस्ता विचारण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून भुरळ पाडली व त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि मोबाईल असा ३५ हजार ८०० रु पये किंमतीचा ऐवज लांबविला होता. ह्या प्रकरणी केळवे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.मात्र ५ महिन्यांचा कालावधी उलटून गेल्या नंतरही त्यांचा शोध लागत नव्हता. या प्रकरणी दोन्ही अज्ञात चोरट्यांचे स्केच काढण्यात आल्या नंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.हेगाजे यांना या प्रकरणातील आरोपी हे सफाळे भागातील असल्याची माहिती खबºयांच्या मार्फत मिळाली.त्यांनी अधिक चौकशी करीत विराज उर्फ ससा संतोष ठाकूर आणि शहाबाज उर्फ बकरा खालिद शेख ह्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने ताब्यात घेतले.त्यांना पोलिसी खाक्या दाखवल्या नंतर त्यांनी आपला गुन्हा कबूल केला असून पोलिसांनी ह्या गुन्ह्यातील ऐवज आणि स्कूटर ताब्यात घेतली आहे.पुढील तपास केळवे पोलीस करीत असून त्यांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार