शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तारापूर येथील स्फोटात दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 01:06 IST

ऑर्गेनिक्स प्रा. लि. या रासायनिक कारखान्यात सोमवारी रात्री अत्यंत ज्वालाग्राही रसायनाचा भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीमध्ये एक सुपरवायझर व एक ऑपरेटर भाजून जखमी झाले

- पंकज राऊतबोईसर : तारापूर एमआयडीसीतील प्लॉट नंबर एन- १५४ मधील वर्षा ऑर्गेनिक्स प्रा. लि. या रासायनिक कारखान्यात सोमवारी रात्री अत्यंत ज्वालाग्राही रसायनाचा भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीमध्ये एक सुपरवायझर व एक ऑपरेटर भाजून जखमी झाले असून यापैकी एक जण गंभीर असून दोघानाही मालाड येथील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या कारखान्यामध्ये रासायनिक प्रक्रि या सुरू असतांना रात्री १२ वाजून २० मिनिटांनी प्रचंड स्फोट होऊन आग लागली तेव्हा सुपरवायझर व ऑपरेटरसह एकूण ७ जण कारखान्यात काम करीत होते. भयंकर स्फोटानंतर कारखान्याचे पत्रे हवेत उंच उडुन जमिनीवर आदळले. तर स्फोटानंतर उंच धुराळा हवेत उडून अंधार पसरून सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.घटनास्थळी एमआयडीसी चे तारापूर अग्निशमन दलाचे बंब त्वरीत घटनास्थळी पोहचून आग विझविण्याचे काम सुरू केल्यानंतर या आगी व धुरातून काही वेळातच पाच जण जीव मुठीत धरून बाहेर पडले मात्र दोन जण मध्येच अडकले होते परंतु ते ही १२:४० च्या सुमारास जखमी अवस्थेत बाहेर पडले त्या दोघांनाही रुग्णवाहिका न मिळाल्याने पोलिसांनी त्यांच्या वाहनांमधून एमआयडीसी मधील तुंगा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या घटनेत सुपरवायझर सुधीर धुमाळ (३५ वर्षे ) हे १५ टक्के तर आॅपरेटर प्रमोद भगत (३८ वर्षे ) हे ५७ टक्के भाजले असून त्यांच्यावर तुंगा हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना मालाड येथील तुंगा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. तर सोमवारी रात्री ८ वाजता दुसरी शिफ्ट सुरू झाली तेव्हा प्रमोद भगत, सुधीर धुमाळ, या जखमी सह अंकुरा माची, गुड्डू सिंग, अखिलेश सिंह व इतर एक असे एकूण सहा जण कामावर होते असे बोईसर पोलिसांनी सांगितले. या कारखान्याच्या आवारात पत्रे फुटून त्याचा खच पडला आहे. या स्फोटाच्या हादऱ्याने शेजारच्या एसएनए हेल्थ केअर या कारखान्याच्या खिडक्या तुटून इक्वीपमेंट डॅमेज होऊन संरक्षण भिंत व पुफ पॅनेल ही डॅमेज झाले असल्याचे पत्र व्यवस्थापनाने पोलिसांना दिले आहे तर स्फोटाचा आवाज परिसरात ३ ते ४ कि. मी. पर्यंत आला होता.>कारखान्याचे नेमके नाव काय ?महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दि. २२ एप्रिल, २०१९ रोजी दिलेल्या कन्सेंटमध्ये कारखान्याचे नाव वर्षा आॅर्गनिक्स प्रा.लि.तर एमआयडीसीच्या पाणी बिलावर व्हिनस केम इंडस्ट्रीज तर सर्वात गंभीर बाब म्हणजे कारखान्यातून सापडलेल्या कागदपत्रांवर सेरिगो एॅडीटीव्हज प्रा. लि. एन -१५४ आहे.>एकही रु ग्णवाहिका घटनास्थळी फिरकली नाही!अवघ्या दहा मिनिटात बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम घटनास्थळी फौज फाट्यासह पोहचले. काही वेळाने दोन जण जखमी अवस्थेत बाहेर पडले त्यांना रुग्णालयात नेण्याकरिता पाच ते सहा रु ग्णवाहिकांशी संपर्क साधला. परंतु कोणीही फिरकले नाही शेवटी पोलिसांच्या वाहनातून जखमींना रुग्णालयात नेले.>नेमकी कुठले उत्पादन सुरु होते?या रासायनिक कारखान्यांमध्ये घटना घडली तेव्हा एन - ब्युटाईल १,२ बेन्झीसोथीयझोलीन हे कन्सेट प्रमाणे उत्पादन सुरू असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी मनीष होळकर यांनी सांगितले.>कारखान्यातील एका रिअ‍ॅक्टरमध्ये ब्यूटाईल अमाईन हे ज्वालाग्रही रसायन वापरून त्या वर रिअ‍ॅक्शन सुरू होती दरम्यान त्या रिअ‍ॅक्टरमध्ये दुसरे रसायन अ‍ॅड करण्यात येत होते परंतु त्या रसायनाचे प्रमाण चुकल्याने त्या रिअ‍ॅक्टरमध्ये असलेले ज्वालाग्रही रसायन बाहेर येऊन त्याचा हवेशी संपर्क स्फोट झाला असा प्राथमिक अंदाज आहे-अ.वि.बाईत, डेप्युटी डायरेक्टर, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय