शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

पासोडीपाड्यातील दोन घरे व तीन गुरे खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 22:47 IST

आगीचे कारण अस्पष्ट : कुटुंबाकडे उपजीवेकेसाठी काहीच उरले नाही

जव्हार : तालुक्यातील ग्रामपंचायत खांबाळापैकी पासोडीपाड्यातील शेतावरील दोघा आदिवासींची घरे जळून खाक झाली असून, मोठी नुकसान झाले असून दोन्ही कुटुंब रस्त्यावर आले आहेत. घरासोबत एक बैल, गाय, वासरू यांचे होरपळन दुर्दैवी मृत्यु झाले तर वर्षभराचे साठवलेले धान्य जळून खाक झाले आहे. परंतु आगीचे कारण समजू शकले नाही.

खंबाळा पैकी पासोडीपाडा येथील शंकर जानू रोज (४५) आणि रमेश रोज (४९) या दोघांची घरे पासोडीपाड्याच्या खाली सिल्वासा हद्दीला लागून शेतावर गेल्या १५ ते २० वर्षांपासून राहत होते.

परंतु सोमवारी हे दोन्ही घरातील माणसं बाहेर गेले होते. मात्र घरात कोणीही नसतांना मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. त्या लागलेल्या आगीत त्या आदिवासीच्या शेतावरील कुडा मातीची घरे संपूर्ण जळाली असून, मोठे नुकसान झाले आहे. त्या जळालेल्या घरात बैल, गाय, वासरू, आणि वर्षभराचे धान्य, तसेच शंकर रोज यांचे १० हजार रुपये जळालेचे सांगितले. त्यामुळे या आदिवासी कुटुंबांचे मोठे नुकसान होवून ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला अडचणीत आले आहे. त्यामुळे वर्ष काढायचे कसे अशी अडचण या कुटुंबांना पडली आहे.

तसेच या कुटुंबाकडे उपजीविकेचे साधन काहीच उरले नाही. त्यामुळे हे दोन्ही कुटुंब अडचणीत सापडली आहेत.संपूर्ण घर जळून खाक झाल्यानंतर या कुटुंबाकडे उपजीवेकेसाठी काहीच उरले नाही अंगावरील कपड्यांसोबत हतबल झालेल्या या कुटुंबाला तत्काळ मदत देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने या घटनेची माहीती मिळताच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा आणि त्यांच्या सहकारीने घटनास्थळी भेट देवून त्यांना गहू तांदूळ बरोबरच कपडे आणि किराणा सामान देवून या कुटुंबाला आधार देवून खऱ्या अर्थाने सांत्वन केले. यावेळी त्या कुटुंबानीही त्यांचे आभार मानले.