शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आईसह दोन मुलांना घरफोडी प्रकरणी अटक 

By धीरज परब | Updated: December 14, 2023 19:47 IST

मीरारोड भागातील एका घरफोडी प्रकरणी काशीमीरा पोलिसांनी आई सह तिच्या दोन घरफोड्या मुलांना अटक केली आहे. त्यांच्या

मीरारोड - मीरारोड भागातील एका घरफोडी प्रकरणी काशीमीरा पोलिसांनी आई सह तिच्या दोन घरफोड्या मुलांना अटक केली आहे. त्यांच्या कडून चोरीचा ८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी पत्रकारांना दिली. मीरारोडच्या प्लेझंट पार्क मध्ये राहणारे वैभव गोपाळ आव्हाड हे ८ डिसेम्बरच्या सायंकाळी कुटुंबियां सोबत गोराई बीच येथे फिरण्यासाठी गेले होते . रात्री पावणे आठ वाजता सर्व घरी आले असता दाराचा कडीकोयंडा तोडलेला तसेच बेडरूम मधील तिजोरीचे लॉक तोडून आतील सोन्या - चांदीचे दागिने आदी ८ लाख ६ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला  होता . घरफोडी प्रकरणी आव्हाड यांच्या फिर्यादी वरून काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.  

उपायुक्त जयंत बजबळे व सहायक आयुक्त महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप कदम, पोलीस निरीक्षक समीर शेख, सहायक निरीक्षक योगेश काळे, उपनिरीक्षक शिवाजी खाडे सह अनिल पवार, दिपक वारे, प्रताप पाचुंदे, राहुल सोनकांबळे, निलेश शिंदे, निकम, रवी कांबळे, प्रविण टोबरे, किरण विरकर, राजेंद्र सुर्यवंशी यांनी घरफोडीचा तपास विविध प्रकारे सुरु केला. गुन्ह्याच्या घटनास्थळी व आजुबाजुचे सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज तपासले असता त्यामध्ये एक संशईत इसम हा घटनास्थळावर येताना व जाताना दिसुन आला. पोलीस ठाणे अभिलेखावरील घरफोडी व चोरी करणारे आरोपी यांचे फोटो तपासले असता त्यामध्ये पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी शमीम मोहम्मद हारुन शहा (२३ ) रा . मुन्शी कंपाउंड, काशीमीरा हा फुटेज मधील संशियत असल्याचे आढळून आले. 

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता गुन्हात त्याचा भाऊ सलीम मोहम्मद हारुन शहा (२५ ) व त्याची आई सैदुनिसा मोहम्मद हारुण शहा ( ५० ) ह्यांचा सुद्धा सहभाग असल्याचे समोर आले. पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांना १५ डिसेम्बर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. शमीम हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर काशीमीरा पोलीस ठाण्यात चोरीचे ३ गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक निरीक्षक योगेश काळे करत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारmira roadमीरा रोड