शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पंचवीस हजार इनाम ठेवलेला कुत्रा अखेर सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 22:42 IST

वसईत काही दिवसांपूर्वी एका कुत्र्याचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. मात्र अपहरणकर्त्याने चोरलेल्या ठिकाणीचा सोमवारी कुत्र्याला सोडून पळ काढला.

विरार : वसईत काही दिवसांपूर्वी एका कुत्र्याचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. मात्र अपहरणकर्त्याने चोरलेल्या ठिकाणीचा सोमवारी कुत्र्याला सोडून पळ काढला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून कुत्र्याबद्दल माहिती देणाऱ्यास २५ हजाराचे इनामही जाहीर करण्यात आले होते. लाडका कुत्रा ‘हॅप्पी’ अखेर सापडल्यामुळे मालकाला हायसे वाटले आहे.वसईच्या गोखिवरे येथील रहिवासी असलेल्या रवी धोत्रे यांचा साधारण एक वर्षाचा पाळीव कुत्रा पेट्रोल पंपावर हरवला होता. धोत्रे कुटुंब कर्नाटकमध्ये आपल्या गावी गेले असता त्यांनी हा कुत्रा आपल्या फादरवाडी येथील पेट्रोल पंपावर कर्मचाºयाच्या देखरेखीखाली ठेवला होता. मात्र शुक्र वारी रात्री पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दुचाकीवरील दोघांनी या कुत्र्याचे अपहरण केले होते. शनिवारी धोत्रे पेट्रोल पंपावर आले तेव्हा कर्मचाºयानी त्यांना कुत्रा हरवल्याची माहिती दिली. यानंतर त्यांनी आपल्या पेट्रोल पंपाचा सीसीटीव्ही तपासला. त्यामध्ये दोन दुचाकीस्वारांनी हॅप्पीचे अपहरण केल्याचे दिसून आले. त्यानुसार त्यांनी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. विशेष म्हणजे धोत्रे यांचा १२ वर्षाचा मुलगा हॅप्पीच्या हरवण्याने व्यथित झाला होता. दोन दिवसांपासून तो जेवलाही नव्हता. त्यामुळे रवी धोत्रे चिंतेत होते. दरम्यान, हॅप्पी हरवल्याच्या बातम्या प्रसिद्धीमाध्यमात आल्यामुळे अपहरणकर्त्याची चांगलीच पंचाईत झाली होती. त्यामुळे अपहरणकर्ते सोमवारी चारचाकी घेऊन पेट्रोल पंपावर आले. या वेळी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्यानंतर मागचा दरवाजा उघडून हॅप्पीला सोडून पळ काढला.