शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

वशिलेबाजीमुळे अनेक शाळा बंद

By admin | Updated: July 15, 2016 01:19 IST

तालुक्यात शिक्षणाच्या बाबतीत अनेक समस्या निर्माण झाल्या असून गट शिक्षणाधिकाऱ्यानी शिक्षकांच्या परस्पर नेमणुका केल्या आहेत. यावेळी शिक्षकांचे

हितेन नाईक,  पालघरतालुक्यात शिक्षणाच्या बाबतीत अनेक समस्या निर्माण झाल्या असून गट शिक्षणाधिकाऱ्यानी शिक्षकांच्या परस्पर नेमणुका केल्या आहेत. यावेळी शिक्षकांचे व्यवस्थित समायोजन करण्यात न आल्याने अनेक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असून पालकांच्या रोषाला लोकप्रतिनिधींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गटशिक्षण अधिकाऱ्याकडे असलेल्या अतिरिक्त पदाचा कार्यभार काढून घेऊन त्यांच्या कडे पूर्णवेळ कारभार सोपविण्यात यावा अशी मागणी पंचायत समिती चे सभापती रवींद्र पागधरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्या कडे केली आहे. पालघर पंचायत समिती मागे अनेक वर्षापासून शिक्षणाच्या बदल्या प्रकरणात बदनाम असून शिक्षकांच्या बेकायदेशीर बदल्या लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपानंतर पैसे घेऊन करणे, आपापल्या जातबांधव शिक्षकांना सोयीच्या ठिकाणच्या शाळा देणे, प्रतिनियुक्तीच्या गोंडस नावा खाली घोळ घालणे, समायोजन न करणे, खोटी पटसंख्या दाखिवणे, आदिवासी विकास घटक योजना भागातून एकस्तर आणि प्रोत्साहन भत्ता लाटता यावा यासाठी मोक्याच्या शाळा बळकाविणे इत्यादी बेकायदेशीर कामे काही माजी गटशिक्षणाधिकारी, गटविकासअधिकारी व सभापती, आमदार यांच्या संगनमताने केली जात होती. या प्रकरणात अनेक प्रभारी गटशिक्षणाधिकारी निलंबित होऊन गटविकास अधिकारी कार्यालयीन चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यामुळे पालघर पंचायत समिती आवार म्हणजे शिक्षक बदलीचा अड्डा बनल्याचा संतप्त प्रतिक्रिया शिक्षका अभावी बंद पडत चाललेल्या शाळातील मुलांच्या पालकांकडून ऐकायला मिळत आहेत.गटशिक्षणाधिकारी चौधरी यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या पालघर उपशिक्षणाधिकारी पदाचाही कार्यभार असल्याने तालुक्यातील ४५० शाळांचे प्रलंबित अनेक प्रश्नाचे निराकरण होत नाही. त्यामुळे चौधरी यांच्याकडे असलेला उपशिक्षणाधिकारी पदाचा कारभार काढून त्यांना फक्त पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी पदाचे कामकाज बघण्याचे आदेश द्यावेत अशी मागणीही सभापती पागधरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.