शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील मोरी गेली वाहून

By admin | Updated: January 25, 2017 04:34 IST

या तालुक्यातील गुजरात व दादरानगर हवेली राज्यांना लागून असलेल्या ग्रामपंचायत रुईघर गोंडपाडा रस्त्यावरील मोरी वाहून गेली आहे.

जव्हार : या तालुक्यातील गुजरात व दादरानगर हवेली राज्यांना लागून असलेल्या ग्रामपंचायत रुईघर गोंडपाडा रस्त्यावरील मोरी वाहून गेली आहे. त्यामुळे तो मृत्यूचा सापळा बनला असून नागरिकांवर जीवघेणा प्रवास करण्याची वेळ आली आहे.तालुक्यातील रूईघर पैकी गोंडपाडा या पाड्यावर जाण्यासाठी लागणाऱ्या रस्त्यातील ओहळावरील संपूर्ण मोरी वाहून गेली आहे. त्यामुळे कोणतेही वाहन या मार्गावरुन नेणे अशक्य बनले आहे. मोरीचे पूर्ण पाईप उघडे पडले आहेत. त्यामुळे येथून जाणे-येणे नागरिकांना व विद्यार्थांना गैरसोयीचे झाले असून मोरीच्या भिंतीला धरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. यापूर्वी या नादुरु स्त मोरीवरून पायी चालतांना मोरीवरून खाली पडून अपघात घडले आहेत. रु ईघर ग्रामपंचायतीचा गोंडपाडा असून या पाड्यात ३२ आदिवासी कुटुंब राहत आहेत. या पाड्यावर जिल्हा परिषदेची शाळा आहे. येथील शिक्षकांना मेनरोडवर दुचाकी ठेऊन ओहोळ उतरून शाळेत जावे लागत आहे. येथील नागरिकांना पावसाळ्यात कसरत करावी लागत आहे. गर्भवतींना आणि रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाणे जोखमीचे बनत आहे. मात्र. या रस्त्याकडे जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष झाले आहे. येथील नागरिकांनी मोरीची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा परिषदेला वारंवार लेखी पत्रे देऊनही तिच्या दुरुस्तीचे काम न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे नादुरूस्त मोरीचे काम लवकरच करण्यात यावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. जर ती तात्काळ मान्य झाली नाही तर या परीसरातील जनता प्रखर आंदोलन उभे करेल असा इशाराही नागरीकांनी जिल्हा परीषदेला दिलेला आहे. (वार्ताहर)