शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
6
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
9
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
10
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
11
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
12
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
13
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
14
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
15
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
16
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
17
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
18
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
19
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
20
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग

तुंगारेश्वर अभयारण्य परिसर इको सेन्सेटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 01:15 IST

तुंगारेश्वर अभयारण्याच्या चार किमी. परिसर इको सेन्सेटीव्ह झोन जाहीर केल्याने यात वसई तालुक्यातील २८ गावांचा समावेश झाला आहे.

पारोळ : तुंगारेश्वर अभयारण्याच्या चार किमी. परिसर इको सेन्सेटीव्ह झोन जाहीर केल्याने यात वसई तालुक्यातील २८ गावांचा समावेश झाला आहे. यामुहे येथील वीटभट्टी आणि दगडखाणी यांवरही बंदी घालण्यात आली असून त्यांचे गौणखनिज परवाने तत्काळ रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे या भागातील भूमिपुत्रांच्या व्यवसायावर गदा येणार आहे.वन्यजीव अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानांच्या सभोवतालचा परिसर इको सेन्सेटीव्ह झोन करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. यानुसार केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने अधिसूचना काढून सर्व राज्यांना त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी तुंगारेश्वर अभयारण्य इको सेन्सेटीव्ह झोन जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्या अनुषंगाने वसईच्या प्रांताधिकाऱ्यांनी आदेश काढून तुंगारेश्वरच्या आसपासच्या परिसराचा इको सेन्सेटीव्ह झोनमध्ये समावेश केला आहे. २८ गावांच्या परिसरातील दगड खाणी तसेच वीटभट्टीचे शुल्क, वाहतूक परवाने रद्द करण्याचे आदेश येथील तलाठी सजा यांना दिले आहेत.>इको सेन्सटीव्ह झोनमधील २८ गावेपारोळ, माजीवली, तिल्हेर, खार्डी, नागला, शैलोतर, पोमन, कामण, देवदळ, चिंचोटी, कोलंही, चंद्रपाडा, टीवरी, राजावली, गोखिवरे, सातीवली, वालीव, पेल्हार, खैरपाडा, टोकरे, शिरगाव, दहिसर, कणेर, शिरसाड, मांडवी, चांदीप, शिवणसई, उसगाव.>संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्यवनसंरक्षण संचालकांचे पत्र महसूल विभागाकडे आले असून याबाबतच्या सूचना येथील महसूल अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. - किरण सुरवसे, तहसीलदार, वसई