पारोळ : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भालिवली येथे ट्रकचालकाच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात मोठी दुर्घटना टळली.गुजरातमधील कांडला येथून लाकडी पट्ट्यांनी भरलेला ट्रक मुंबईकडे जात असताना तो भालिवली येथे वन विभागाच्या तपासणी नाक्यावर आल्यावर उभा केला असता तो उतारावरून मागे सरकल्याने पलटी झाला. सुदैवाने पाठीमागील बाजूस कोणतेही वाहन न आल्याने मोठा अपघात टळला. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी वाहतूककोंडी होऊ नये म्हणून तत्काळ ट्रक मार्गाच्या बाजूला करून चालकाला ताब्यात घेतले. (वार्ताहर)
चालकाच्या चुकीमुळे ट्रक कलंडला
By admin | Updated: July 8, 2015 22:19 IST