निखील मेस्त्री नंडोरे: गावच्या वेशिवरून विविधरूपी सोंगे घेऊन नाचत वाजत गाजत मंदिरापर्यंत आणून पारंपरिक पद्धतीने पुजाºयामध्ये देवाची मनोभावे पूजा करून होणारी उत्सवाची सुरु वात म्हणजे पालघरमधील आदिवासी जमातीचा वाघोबा उत्सव. प्राचीन काळापासूनची आदिवासींची संस्कृती, रीती परंपरा व सामाजिक सलोखा जपत आलेला वाघोबा उत्सव यंदाही तितक्याच उत्साहाने साजरा करण्यात आला.तालुक्यातील पालघर मनोर रस्ता स्थित वाघोबा खिंड परिसरातील वाघोबा देवस्थानाचा वाघोबा उत्सव म्हणजे जिल्ह्यातील व परिसरातील लहानग्यांपासून थोरल्यापर्यंत आदिवासी बिगरआदिवासी बांधवांचा आनंदोत्सव होय. या दिवशी सर्व काही बाजूला सारत स्वत:च्या समाजाप्रती असलेली निष्ठा व एकत्र कुटुंबपद्धतीची परंपरा याचे जिवंत उदाहरण येथे पहावयास मिळते.पालघरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या वाघोबा घाटात आजच्या आधुनिक युगातही आदिवासी संस्कृतीचा वारसा जपत आहे. परंपरा जपणारा समाज म्हणून आदिवासी समाज आजही सर्वश्रुत आहे. निसर्ग पूजणारा हा आदिवासी समाज व समाज बांधव या दिवशी एकत्र येत परिसरातील प्राचीन काळापासून असलेल्या वाघोबा, भिलोबा व मेघोबा देवाची मनोभावे पूजा-अर्चा करून हा निसर्ग अबाधित ठेवण्यासाठी साकडे घालतो.वाघोबा खिंड चढताना प्रथमदर्शनी समोर येते ते वाघोबा देवस्थान, याच देवस्थानाच्या मागील बाजूस डोंगराळ भागात मेघोबा व खिंडीकडे चढताना वनराईत असलेले भिलोबा देवस्थान आहे. येथे प्राचीन काळापासून पाऊस पडावा यासाठी मेघदेव म्हणजेच मेघोबाला पूजण्याची व जागर घालायची परंपरा खूप जुनी आहे. या उत्सवात येणाºया प्रत्येक भाविकास महाप्रसाद म्हणून भोजनात मांसाहारी जेवण देण्याची वेगळी प्रथा खुप काळापासून असल्याचे म्हटले जाते.
पालघरमध्ये आदिवासी जमातीचा वाघोबा उत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 11:32 PM