शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी समाज प्रबोधनवर फौजदारी

By admin | Updated: August 11, 2016 03:54 IST

जव्हार प्रकल्प कार्यालयात सन २००६-७ ते सन २०१४-१५ च्या दरम्यान आदिवासी समाज प्रबोधन संस्था व प्रकल्प कार्यालयाचे संबंधित अधिकारी यांनी

रविंद्र साळवे, मोखाडाजव्हार प्रकल्प कार्यालयात सन २००६-७ ते सन २०१४-१५ च्या दरम्यान आदिवासी समाज प्रबोधन संस्था व प्रकल्प कार्यालयाचे संबंधित अधिकारी यांनी संगनमताने केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी ही संस्था व तत्कालीन सहायक प्रकल्प अधिकारी राजाराम हळपे व लिपिक व्ही.एल.पाटील यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या वृत्ताला पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव आणि विद्यमान प्रकल्प अधिकारी बाबासाहेब पारधे यांनीही दुजोरा दिला आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने २५ जुलैच्या अंकात हेडलाईनने प्रसिद्ध केले होते. आजवर दडपलेले भ्रष्टाचाराचे हे प्रकरण लोकमतने खोदून काढले. आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्याच मतदारसंघात व त्यांच्याच विभागात करोडोचा भ्रष्टाचार होऊन देखील कारवाई न होता ते पाठीशी घातले जात होते. लोकमतच्या वृत्ताने अप्पर आयुक्त ठाणे यांना जागे केले असून आदिवासी समाज प्रबोधन या संस्थेवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जव्हार प्रकल्प कार्यालयाला दिले आहेत तसेच या संस्थेने भ्रष्टाचार केला असल्याचे चौकशीदरम्यान उघड झाल्या नंतर आदिवासी समाज प्रबोधन संस्था आणि संबंधित दोषी सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजाराम हाळपे व लिपिक व्ही. एल. पाटील यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची परवानगी अप्पर आयुक्त ठाणे यांच्याकडे पत्राद्वारे मागितली होती त्या अनुषंगाने २५ जुलै रोजी प्रकल्प कार्यालयास पत्र पाठवून त्या संस्थेवर फौजदारी दाखल करण्याचे आदेश दिले गेले आहेत व संबधित लिपिक व अधिकारी यांच्यावरील दोषारोप तात्काळ अप्पर आयुक्त ठाणे यांना सादर करण्यास सांगितले आहे. त्यानंतर या प्रकरणात गुंतलेले सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजाराम हाळपे लिपीक व्ही एल पाटील यांच्यावर प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे. असे असले तरी यांच्यावर कारवाईची टांगती तलवार न ठेवता तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. लोकमतने निर्भीडपणे हे वृत्त प्रसिद्ध केल्यामुळे अनेकांनी कौतुक केले आहे. तसेच आमचा या प्रकरणाशी काहीच संबंध नसल्याचा या दोघांचा दावा खोटा ठरला आहे. अप्पर आयुक्त ठाणे यांच्या आदेशानुसार आदिवासी समाज प्रबोधन संस्थेविरुद्ध फौजदारी दाखल करण्याचे प्रकरण जव्हार पोलीस स्टेशन मध्ये पाठवण्यात आले आहे. तसेच यात दोषी असलेले अधिकारी व लिपिक यांच्याविरुद्धचे दोषारोपपत्र तयार करण्यास घेतले असून लवकरच ते कारवाईसाठी पाठवले जाणार आहे.