शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिका-यांनी केलेल्या धक्काबुक्की व अपशब्दांच्या निषेधार्थ आज पोलीस अधीक्षक कार्यालयावर आदिवासींचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 03:05 IST

पालघरच्या उपविभागीय पोलीस अधिका-यांनी केलेल्या धक्काबुक्की व अपशब्दांच्या निषेधार्थ आज आदिवासी एकता परिषदेसह इतर संघटनांनी पोलीस अधिक्षक कार्यालयावर मोर्चा काढून आपला रोष प्रकट केला

पालघर: आदिवासी एकता परिषदेचे नेते व आदिवासी सेवक काळूराम धोदडे (काका) यांना पालघरच्या उपविभागीय पोलीस अधिका-यांनी केलेल्या धक्काबुक्की व अपशब्दांच्या निषेधार्थ आज आदिवासी एकता परिषदेसह इतर संघटनांनी पोलीस अधिक्षक कार्यालयावर मोर्चा काढून आपला रोष प्रकट केला व काकांना धक्काबुक्की करणारे पोलीस अधिकारी निमित्त गोयल यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.२३ आॅक्टोबर रोजी तालुक्यातील लोवरे व निहे या दोन गावात वडोदरा एक्सप्रेस वे प्रकल्पासाठी गावातील जमीनीची मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आले असता योग्य त्या परवानग्या नसल्याने व ही गावे पेसा असून त्यांच्या ग्रामसभांचे ठराव नसल्याने संबंधित अधिकाºयांना ती मोजणी करता येणार नसल्याचे या गावकर्यांनी सांगितले व त्याला विरोध दर्शविण्यासाठी काळुराम धोदडेंसह इतर संघटनेचे पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते. निहे गावात या मोजणीला तीव्र विरोध झाल्यामुळे ती होऊ शकली नाही व तसा पंचानामाही अधिकाºयांनी लिहिला.लोवरे गावातही लोकांच्या तीव्र विरोधामुळे मोजणी होऊ शकली नाही व अधिकारी तसा पंचनामा बनविण्याच्या तयारीत असताना दुपारच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी निमित्त गोयल लोवरे येथील घटनास्थळी पोचले. त्यांनी ग्रामस्थांना दमबाजी करून अधिकाºयांना शेतात जाऊन मोजणी करण्यास सांगितले. त्यावर तिथे उपस्थित आदिवासी एकता परिषदेचे काळुराम धोदडे यांनी गोयल यांना अनुसूचित कायदा लागू असलेल्या गावाच्या ग्रामसभेचे ठराव नसताना ही मोजणी कशी करणार? व मोजणीचा अधिकार पोलिसांना कोणी दिला? अशी विचारणा केली असता गोयल यांनी हमको कायदा मत सिखावो असे उलट उत्तर देत धक्काबुक्की केली. यावर उपस्थितांनी गोयल यांना धोदडेंना अपमानास्पद वागणूक दिल्याचा जाब विचारला.मात्र गोयल यांनी मै आदिवासी बादिवासी कुछ नाही जानता, ऐसे आदिवासी सेवक बहोत देखे है असे उत्तर दिल्याचा आरोप संघटनेने केला आहे. तर दुसरीकडे लोवरे येथील कामिना पाटील या वृद्धेच्या शेतात मोजणी कर्मचारी विनापरवानगी जबरदस्ती घुसले. त्यांनी त्यांना अडविले असता त्यांनाही कर्मचाºयांनी धक्काबुक्की करून त्यांचा अवमान केला, असा संघटनेने आरोप केला आहे.पालघर रेल्वे स्थानकावरून आदिवासी एकता परिषद, भूमिसेना, कष्टकरी संघटना, शेतकरी संघर्ष समितीसह इतर संघटनांच्या पाठिंब्यासह हजारोच्या संख्येने निघालेल्या मोर्चाने निवेदन पोलीस अधिक्षकांना देण्यासाठी अधिक्षक कार्यालयाजवळ येऊन थांबला.मात्र अधिक्षकांना काम आल्याने त्यांची भेट मोर्चेकºयांशी रस्त्यावरच झाली तिथे अधिक्षक मंजुनाथ सिंगे यांनी मोर्चेकºयांशी चर्चा केली. मोर्चेकºयांनी पुढे जाऊन कायदेशीर कारवाईच्या मागणीचे निवेदन अपर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण यांना दिले.