शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींचा विकास कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:24 IST

शासनाने आदिवासींच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या मात्र त्यांची काटेकोर अंमलबाजवणी अभावी नागरिकांना जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे.

अनिरुद्ध पाटीलबोर्डी : शासनाने आदिवासींच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या मात्र त्यांची काटेकोर अंमलबाजवणी अभावी नागरिकांना जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, समस्या निवरण्यात चालढकल करणाºया अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.तालुक्यातील कैनाड ग्रामपंचायती अंतर्गत कडूपाडा येथील मोरी दोन वर्षांपूर्वी पुरात वाहून गेली. स्थानिकांची गैरसोय टाळण्यासाठी या ग्रामपंचायतीने निधी उपलब्ध करून तात्पुरती डागडुजी केली. मात्र, यावर्षी पुन्हा पुरामुळे जैसे थे स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या पाड्यावरील रु ग्ण, गरोदर महिला, स्तनदमाता, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि चाकरमाण्यांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. पावसाळ्यात वाहत्या ओहळातून वाट काढण्यासाठी चादरीची झोळी करून रु ग्णांना न्यावे लागत होते. त्यावरून स्तनदामाता व गर्भवतींवर ओढावणाºया परिस्थितीची कल्पना येते. दुचाकीला खांद्यावर उचलून ओहळ ओलांडल्याचे अनुभव ग्रामस्थांकडून ऐकताना अंगावर काटा येतो. या बाबत सदर ग्रामपंचायतीकडून लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले आहे. मात्र आजही परिस्थिती बदलली नसल्याचे चित्र पाहावयास मिळते.चिखले गावातील मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली आहे. मोठमोठ्या खड्यांनी अनेक अपघात घडले असून मान, कंबर, मणका अशा विविध आजारांनी ग्रामस्थांना ग्रासले आहे. बँकेतील कर्ज काढून खरेदी केलेली वाहनं वर्षाच्या आतच खिळखिळी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रस्ता मंजूर झाला आहे. वर्क आॅर्डर काढण्यात आली असून दिवाळींनंतर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होईल अशी आश्वासने बांधकाम विभागाकडून दिली जातात. स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र आपण विकास कामं आणल्याच्या बाता मारतात, काम सुरू करण्या कडे लक्ष देत नाही अशी स्थिती आहे. चिखले रेल्वे फाटकापासून सुमारे दीड किलोमीटरचा रस्ता दोन वर्षापूर्वी करण्यात आला. मात्र भाईपाडा येथे डांबराचा थर सहा महिन्यात वाहून गेला. वाकी ग्रामपंचायतीला २०१६-१७ सालचा पेसा ५ टक्के निधी मिळालेला नाही. या करीता डहाणू पंचायत समिती ते पालघर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडे सदर ग्रामपंचायत सातत्याने पाठपुरावा करीत आहे. मात्र, मंजूर निधी मिळविण्यात अडचणींचासामना करावा लागत आहे. तथापी निधी अभावी ग्राम विकास साधणार कसा हा असा प्रश्न पंचायतीला पडला आहे.