शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

हवालदार आत्महत्येप्रकरणी आदिवासी विकास परिषदेची ‘चलाे पालघर’ची हाक, जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 00:11 IST

Vasai : आदिवासी समाजातील असलेल्या भाेये यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुळिंज पाेलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांच्यावर सदाेष मनुष्यवध, रॅगिंग ॲक्ट आणि अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करावा, या मागणीसाठी हा माेर्चा काढण्यात येणार आहे.

वसई : तुळिंज पाेलीस ठाण्यामध्ये वरिष्ठांच्या छळवणुकीला कंटाळून पाेलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांच्या दालनात गुरुवारी वाघेरपाडा ठाणापाडा येथील रहिवासी पाेलीस हवालदार सखाराम भाेये यांनी आत्महत्या केली. या घटनेचा निषेध करण्यासाठी शनिवारी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय आणि पाेलीस अधीक्षक कार्यालयावर धडक माेर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी आदिवासींना माेठ्या संख्येने सहभागी हाेण्याचे आवाहन परिषदेचे महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी केले आहे.आदिवासी समाजातील असलेल्या भाेये यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुळिंज पाेलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांच्यावर सदाेष मनुष्यवध, रॅगिंग ॲक्ट आणि अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करावा, या मागणीसाठी हा माेर्चा काढण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणी मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते यांना जाब विचारला जाणार आहे. या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी सर्व आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे, तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील सर्व संघटना, पदाधिकाऱ्यांनी आपले पोलीस ठाणे व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन पाठविण्याचे आवाहन जाधव यांनीकेले आहे.

सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल करा : सुनील भुसारा-डहाणूचे आमदार सुनील भुसारा यांनी आत्महत्येप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत परिमंडळ ३ च्या तुळिंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांच्यावर सदोष मनुष्यवध आणि इतर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच भोये यांच्या कुटुंबाला सर्वतोपरी न्याय देण्याची मागणी केली आहे. तर मीरा-भाईंदर, वसई-विरारचे पाेलीस आयुक्त डाॅ. सदानंद दाते म्हणाले, या घटनेनंतर मी तत्काळ घटनास्थळी पाेहाेचलाे. यासंदर्भात नेमके काय घडले आणि या घटनेची पार्श्वभूमी काय होती, याबाबत परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त चाैकशी करीत आहेत. चौकशीत सत्य समोर येईल. त्यानंतर दोषींवर नक्कीच कारवाई होईल.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार