शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेतील शिपाई एसीबीच्या जाळ्यात

By admin | Updated: July 27, 2015 23:01 IST

बाजार कराची वसुली निश्चित दरापेक्षा अधिक करून त्याची पावती न देताच कराचा परस्पर अपहार करणाऱ्या पालिकेतील शिपायाला ठाणे एसीबी (अ‍ॅण्टी करप्शन ब्युरो) ने

भार्इंदर : बाजार कराची वसुली निश्चित दरापेक्षा अधिक करून त्याची पावती न देताच कराचा परस्पर अपहार करणाऱ्या पालिकेतील शिपायाला ठाणे एसीबी (अ‍ॅण्टी करप्शन ब्युरो) ने रविवारी (२६ जुलै) दुपारी रंगेहाथ पकडले आहे. या शिपायाचे नाव राकेश कारभारी त्रिभुवन (२५) (रा. भार्इंदर पूर्व) असे असून तो पालिकेत कार्यरत आहे. पालिकेने तत्कालीन महासभेच्या मान्यतेने प्रतिपावतीप्रमाणे २५ रु. दर बाजार करासाठी निश्चित केला आहे. त्याचा ठेका स्थानिक ठेकेदारांना लिलाव पद्धतीने देण्यास सुरुवात केल्यानंतर काही ठेकेदारांनी पालिकेत जमा केलेल्या अनामत रकमांपेक्षा जास्त दराने कराच्या वसुलीस सुरुवात केली. कराच्या जादा वसुलीमुळे ठेकेदार गब्बर होत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांच्यावर कारवाई करणे दूरच उलट ठेक्याची रक्कम वाढविण्यास प्रशासनाने सुरुवात केली. आता पालिकेकडूनच कर वसूलीस सुरुवात करण्यात आली असून त्यासाठी काही शिपायांना नियुक्त केले आहे. या कर्मचाऱ्यांनाही ठेकेदाराच्या जादा वसुलीसह वसुलीची पावती न देण्याचे व्यसन जडले. कराच्या जादा वसुलीविरोधात भार्इंदर पश्चिमेकडील एका फेरीवाल्याने ठाणे एसीबीकडे तीन आठवड्यांपूर्वी तक्रार केली होती. एसीबीने रविवारी आठवडाबाजारात सापळा लावला असता त्यात राकेश याला रंगेहाथ अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)