शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

वसईसह दोन शहरांतील वाहतूककोंडी फुटणार

By admin | Updated: November 16, 2015 23:50 IST

वसई-विरार शहरांतील वाहतूककोंडीची समस्या लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. मनपा हद्दीतील चार शहरांत सिग्नल यंत्रणा बसवण्याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली.

वसई : वसई-विरार शहरांतील वाहतूककोंडीची समस्या लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. मनपा हद्दीतील चार शहरांत सिग्नल यंत्रणा बसवण्याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली. सध्या ४ शहरांतील वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यापूर्वी चार नगरपरिषदा अस्तित्वात असताना नवघर-माणिकपूरने सिग्नल यंत्रणा बसविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, शासकीय अनुदान न मिळाल्यामुळे या सिग्नलचे दिवे कधी पेटलेच नाहीत. काही वर्षांत ४ शहरांमध्ये चारचाकी, दुचाकी वाहने व रिक्षांमध्ये भरमसाट वाढ झाली. तीन वर्षांपूर्वी परिवहन सेवा सुरू झाली, त्यामुळे सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी जाणवू लागली. वाहतूक पोलिसांकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण राखण्याकामी त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाहनांच्या संख्येतील भरमसाट वाढ लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने आपल्या हद्दीत सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. या प्रस्तावास नुकतीच मंजुरी मिळाल्यामुळे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १५ वर्षांपूर्वी तत्कालीन नवघर-माणिकपूर नगरपरिषदेने आपल्या हद्दीत सिग्नल व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. (प्रतिनिधी)