शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन कर्मचाऱ्यांनी उगारले संपाचे हत्यार; वर्षभरापासून पगार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 23:56 IST

बुधवारी पहाटेपासून कर्मचाऱ्यांनी पुकारला संप; वाहतुकीवर फार परिणाम नाही

नालासोपारा : वर्षभरापासून पगार मिळाला नसल्याने वसई - विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या चालक आणि वाहकांनी बुधवारी पहाटे ५ वाजल्यापासून संप पुकारला. परिवहन विभागातील तीनही संघटनांतील ९०० कामगारांनी एकत्र येऊन हा संप पुकारत सर्व बसेस बंद ठेवल्याने एकही बस वसई तालुक्यात रस्त्यावर धावली नाही.

महानगरपालिकेने परिवहन विभागातील हिरव्या पिवळ्या बसेस हद्दीत चालवण्यासाठीचे कंत्राट भागीरथी ट्रान्सपोर्टला दिले आहे. परिवहनकडे १६० बसेसचा ताफा असून १४० बसेस शहरात चालवल्या जातात. यावर काम करणारे ९०० चालक आणि वाहक यांना वर्षभरापासून कंत्राटदाराने पगार दिलेला नाही. पीएफचे पैसे अजून जमा केलेले नाही, सहा महिन्याला ५०० रुपये प्रमाणे वाढणारा पगार तीन वर्षांपासून वाढलेलाच नाही, अशा अनेक कारणांवरून कामगारांनी बुधवारी कामबंद आंदोलन करत संपाचे हत्यार उपसले. याआधी दोन वेळा संप पुकारला होता पण आयुक्त आणि कंत्राटदार यांनी आश्वासन दिल्यावर संप मागे घेतला होता. यावेळी मात्र, सर्व कामगारांनी जोपर्यंत पगार खात्यात किंवा हातात मिळत नाही तोपर्यंत संप मिटवणार नसल्याचे ‘लोकमत’ला सांगितले आहे.

वसई पश्चिमेकडील डेपोमध्ये हे कामगार आंदोलन करत असून मध्यस्थी करण्यासाठी भागीरथी ट्रान्सपोर्टचे संचालक मनोहर सकपाळ आले होते. ते एका कामगाराला जोरात बोलल्याने सर्व कर्मचारी त्यांच्यावर भडकले. आणि सकपाळ यांनी तेथून काढता पाय घेतल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. याबाबत सकपाळ यांना संपर्क केला तर त्यांनी फोन उचलला नाही.परिवहनच्या कामगारांनी पगार जास्त मिळावा म्हणून संप पुकारला आहे. यामुळे परिवहन सेवेच्या बसेस बंद आहे. कंत्राटदार आणि कामगारांमधील हा वाद आहे. त्यांचे पगार महानगरपालिका देत नसून कंत्राटदार देतो. संपामुळे महानगरपालिकेचे नुकसान झाले नसून त्या कंत्राटदारांचे झाले आहे. - प्रितेश पाटील, सभापती, परिवहन विभाग, वसई विरार महानगरपालिकावर्षभरापासून पगार नाही, पीएफ नाही, सहा महिन्याला होणारी इन्क्रीमेंट ३ वर्षांपासून थकीत, सोसायटीमधून लोन देणार म्हणून सोसायटी बनवली पण लोनसुद्धा वेळेवर नाही यामुळे सर्व नाराज चालक आणि वाहक ९०० कामगारांनी संप पुकारला आहे. जोपर्यंत पगार खात्यात किंवा हातात मिळत नाही तोपर्यंत संप मिटणार नाही. - सोमनाथ गायकवाड, चालक

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार